Ticker

6/recent/ticker-posts

काकाचीवाडीमध्ये राजारामबापू पाटील यांना अभिवादन



संदिप गावडे @ प्रतिनिधी 

       काकाचीवाडी ता. वाळवा येथील काकाचीवाडी विकास सेवा सहकारी सोसायटी व काकाचीवाडी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने लोकनेते राजारामबापू पाटील यांची ४१ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

          यावेळी बोलताना शिवाजी ढोले म्हणाले, महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी बापूंनी मंत्रीपदाच्या कार्यकाळात शेती, उद्योगधंदे, रोजगाराची वाढ, सहकार क्षेत्राचा प्रसार केला. तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाला चालना देऊन पश्चिम महाराष्ट्रासह, विदर्भ व मराठवाडा यांचा समतोल साधत महत्वपूर्ण निर्णय घेतले होते. 

       राजारामबापूंनी मंत्री म्हणून महसूल, उद्योग, वीज, नागरी पुरवठा, सहकार, वन, ग्रामीण विकास, विधी व न्याय आणि अर्थ खात्याची जबाबदारी उत्कृष्टरित्या सांभाळली. सत्तेचा उपयोग जनकल्याणासाठी कसा करता येतो, हे बापूंनी घेतलेल्या विविध निर्णयामधून दाखवून दिले आहे. बापूंनी घेतलेल्या धोरणांचा महाराष्ट्राच्या जीवनावर कायमचा ठसा उमटलेला आहे. त्याचबरोबर समाज जीवनाला दिशा देण्याचे काम आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम तसेच विकासावर आधारित असलेले राजकारण आ. जयंत पाटील करीत आहेत, असेही ते म्हणाले.

        यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजी ढोले, व्हा.चेअरमन संभाजी रूपनर, संचालक राजेंद्र जाधव, अशोक मालेकर, मधुकर माळी, राजेंद्र ठोके, भास्कर शेटे, विपूल खुडे, अमिर पट्टेकरी, रियाज मानेखान, मौला महाब्री, हणमंत काटे, शुभम मालेकर, महेश घोरपडे, दशरथ मालेकर, सौरभ मालेकर, अक्षय चव्हाण असे प्रमुख उपस्थित होते.