Ticker

6/recent/ticker-posts

जे क्षेत्र निवडाल त्यात आदर्शवत कार्य करा - सपोनि संदीप पोमण



बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]

 विद्यार्थ्यांनी शालेय वयात प्रामाणिकपणे क्रमिक पुस्तकांचा अभ्यास करावा. स्पर्धा परीक्षेसाठी शालेय अभ्यास उपयुक्त ठरतो. त्याचप्रमाणे आयुष्यात आई वडिलांचे संस्कार गुरुजींची शिकवण यांचा विसर पडू देऊ नका. मोबाईल पासून, व्यसनापासून दूर राहा. वाईट संगतीचा परिणाम वाईटच होत असतो .आयुष्यात माणूसपण व  माणुसकी विसरू नका. थोरामोठ्यांची चरित्रे वाचा . समाजात शांतता सुव्यवस्था राहावी यासाठी नेहमी दक्ष रहा. परिस्थितीनुसार निर्णय  घेता आले पाहिजेत. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करताना ज्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत असाल त्या क्षेत्रातले आदर्श व्हा 

 असे विचार पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप पोमण  यांनी  केले .           .                  पुसेगाव येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित गुणवत्ता वाढ प्रकल्प मार्गदर्शन शिबिरात त्यांनी  व्यक्त केले .

  कार्यक्रमास संस्था अध्यक्ष, डॉ .सुरेशराव जाधव ,संस्था सचिव श्री मोहनराव जाधव, संस्था विश्वस्त श्री विश्वनाथराव जाधव ,  श्री एस .आर. पाटील , गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी श्री के .डी. पवार सर , श्री .डी .पी. शिंदे सर ,संस्था सदस्य श्री जयंतराव जाधव ,संजय भागवत  ,   प्राचार्य श्री डी एन गोपने, पर्यवेक्षक श्री आर .एन . जाधव . श्री अशोक वळवी ,श्री संजय वायदंडे, सौ शोभाराणी लाड ,सौ हेमलता देशमुख ,सौ पाटील , श्री जगदीश कुचेकर, त्याबरोबर शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 संस्था अध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव यांनी आपल्या मनोगतात मार्गदर्शन शिबिरातील तज्ञ व्यक्तींचे विचार  आयुष्याच्या जडणघडणीत महत्त्वाचा ठरणार असून विद्यार्थ्यांनी वेळोवेळी आदर्श विचारांवर कार्यरत राहावे. भविष्यात यशस्वी जीवन जगताना शाळा माऊली तसेच ग्रामभूमी आई-वडील यांचा विसर पडू देऊ नये . असे विचार मांडले.

शाळेतील निवृत्त कर्मचारी  श्री चंद्रकांत घनवट यांनी शाळेस २५००० रु मदत केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

 एस. आर. पाटील सर यांनी प्रास्ताविक केले .

 श्री शिंदे डी.पी. यांनी आभार मानले .

श्री मोहनराव गुरव यांनी सूत्रसंचालन केले