प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
डोणगाव अलीकडच्या काळात विद्यार्थी जीवन अतिशय व्यस्त झालेली असून विद्यार्थी सकाळपासून ते रात्रीपर्यंत कोणत्यातरी परीक्षेची तयारी करण्यात गुंतलेला असतो खेळ अंगी भूत असणारे कला गुण शिक्षण पूरक वाचन मनोरंजन इत्यादी गोष्टींना त्याच्या जीवनात स्थान उरलेले नाही आजचा विद्यार्थी हा यंत्रवत झालेला आहे पण जीवनात अभ्यासाशिवाय इतर गोष्टींनाही महत्त्व आहे स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांचा अविष्कार करण्याची संधी मिळते विद्यार्थ्यांनी काही क्षण अभ्यासाचा ताण बाजूला ठेवून स्नेह संमेलनाच्या विविध कार्यक्रमात सहभागी होऊन आनंदाचा आस्वाद घ्यावा असे प्रतिपादन माजी प्राचार्य जीवनसिंह दिनोरे यांनी केले डोणगाव येथील स्वर्गीय इंदिरा माधव सावजी सहकार विद्या मंदिराच्या वार्षिक स्नेहसंमेलन ( स्नेहबंध ) च्या उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. यावेळी आपल्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापक गाढे यांनी शालेय प्रगतीची आणि शाळेतील विविध उपक्रमाबद्दल विस्तृत माहिती दिली.
दिनांक 8 व 9 जानेवारी रोजी स्नेहसंमेलन थाटात पार पडले याप्रसंगी स्थानिक सल्लागार समितीच्या अध्यक्ष रूपा सावजी समिती संचालक पूर्वा सदावर्ते.दिलीप कळसकर. हितेश सदावर्ते. विजय काळे. केंद्रप्रमुख तथा गट समन्वयक प्रमोद रायमुलकर बुलढाणा अर्बन सोसायटीचे विभागीय अधिकारी शिरसाठ. शाखाधिकारी शाखाधिकारी वाहेकर. डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे सहकार विद्या मंदिराचे मुख्याध्यापक गाढे. उपमुख्याध्यापक नखोत. इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी ठाणेदार अमरनाथ नागरे यांनी मोबाईलचा वापर करताना घ्यावयाची काळजी रहदारीचे नियम सायबर अपराध आदीबाबत विस्तृत मार्गदर्शन केले पालकांनी याबाबत दक्ष रहावे असे आवाहन केले दोन दिवसीय स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी संगीत नाटिका ऐतिहासिक देखावे सामूहिक नृत्य इत्यादी बहारदार कार्यक्रम सादर केले दोन्ही दिवस प्रेक्षकांणी गर्दी केलेली होती विशेष करून महिला पालकांची उपस्थिती लक्षणीय होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक पंडितकर व आभार प्रदर्शन जुनघरे यांनी केले स्नेहसंमेलन कार्यक्रम यशस्वी व्हावे म्हणून सहकार विद्या मंदिराचा सांस्कृतिक विभाग क्रीडा विभाग शिक्षक व इतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले





Social Plugin