Ticker

6/recent/ticker-posts

स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांचा आदर्श महिलांनी घ्यावा - श्रावण जाधव



 (मालेगाव प्रतिनिधी):- जावेद धन्नू भवानीवाले 


        मालेगाव दि :03/01/2025 तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय सुदी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती कार्यक्रमात स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांचा आदर्श महिलांनी घ्यावा असे श्रावण जाधव यांनी सांगितले.

   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे महासचिव श्रावण जाधव होते प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच सौ.प्रतिभा संदीप चव्हाण,उपसरपंच परमिला गोवर्धन राठोड,सचिव खुळे तसेच कृषी सहाय्यक देशमुख साहेब व त्र्यंबक चव्हाण कारभारी यांची उपस्थिती होती. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करत असताना जाधव सर यांनी अशी स्पष्ट केले की महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन आपल्या मुला मुलींना शिक्षणाची धडे द्यावे महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये महिला पुढे याव्यात याकरिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली सन १८४८ ला पुणे येथील भिडे वाड्यात सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. याकरिता त्यांना बराच त्रास सहन करावा लागला महिला जे आज शिक्षण क्षेत्रामध्ये भरारी घेत आहे तसेच राजकीय सामाजिक सांस्कृतिक

आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेत आहेत. याचे मुख्य गुरु क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहेत. सर्व जाती-धर्माच्या स्त्रियांना शिक्षण मिळावा. व स्त्री स्वालंबी बनावी हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून सावित्रीबाईंनी त्यावेळी धाडसी निर्णय घेऊन स्वत महात्मा ज्योतिबा फुलेच्या मार्गदर्शनाखाली स्वतः शिक्षण घेऊन शिक्षिका बनल्या व महिलांचे शिक्षणाचे दार खुले केले. अशा महान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श महिलांनी घ्यावा व सर्वांगीण विकास साधावा असे मनोगत जाधव सर यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला गावातील शेतकरी बांधव ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रदीप कांबळे,अरुण चव्हाण, रमेश चव्हाण, ज्ञानेश्वर जाधव, अनिल राठोड, सचिन जाधव, सुनील टेंबे यांनी परिश्रम घेतले.