Ticker

6/recent/ticker-posts

किन्हिराजा चौकीचे बीट जमादार विजय सोनुने यांचे अपघाती निधन



मालेगाव (जावेद भवानीवाले )


मालेगाव :तालुक्यातील किन्हीराजा पोलीस चौकीचे बीट जमादार विजय सोनुने यांचा ३१ डिसेम्बर च्या रात्री अपघात झाला होता. त्या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने अकोला येथील खाजगी हाॅस्पिटल मध्ये दाखल केले होते तेथे त्यांचे दुखद निधन झाले.

    जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या किन्हिराजा पोलीस चौकीत गेल्या एका वर्षा पूर्वीपासून विजय प्रल्हाद सोनुने कार्यरत होते ३१ डिसेम्बर च्या रात्री त्याचा त्याचा अपघात झाला होता त्या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचेवर अकोला येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू होता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. त्यांना २ मुल पत्नी असा परिवार आहे.