Ticker

6/recent/ticker-posts

सांगलीत लोणारी समाज भवन जागेसाठी मागणीचे खासदारांना निवेदन



संदीप गावडे @  प्रतिनिधी 

          लोणारी समाज सेवा समिती सांगलीच्यावतीने सांगली शहरामध्ये प्रलंबित लोणारी समाजभवनासाठी जागेचे मागणीचे निवेदन खा. विशाल पाटील यांना देण्यात आले. 

        सांगली येथे झालेल्या लोणारी समाजाच्या कार्यक्रमावेळी दिलेल्या या निवेदनाबाबत बोलताना विजय नरळे म्हणाले, सांगली मिरज कुपवाड तसेच शहरालगत असलेल्या गावात लोणारी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. तरी ही जिल्ह्यात विखुरलेल्या समाजाला एकत्र येता यावं यासाठी समाज भवन असावे म्हणून ही मागणी करीत आहोत. यावेळी लोणारी समाज सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत खा. विशाल पाटील यांनी सकारात्मक चर्चा केली. लोणारी समाज भवन उभारणीसाठी मदत करू असे आश्वासनही दिले. 

         यावेळी लोणारी समाज सेवा समिती सांगलीचे अध्यक्ष विजय नरळे, कार्याध्यक्ष प्रल्हाद नरळे, सचिव संजय खोत, समाजसेविका सुनीताताई आवटे, रामचंद्र टोणे सर, उपाध्यक्ष बाबासो गोडसे, संदीप धंगेकर, खजिनदार बाबासो मुंजे, संघटक नवनाथ खिलारे, भूषण होळकर, हणमंत कुटे, राम खिलारे, सिध्दनाथ बजबळे, दत्ता हिप्परकर, गोपाळ चवरे मेजर, हणमंत बजबळे मेजर, रघु नवत्रे, आनंदा करांडे, रवि सांगोलकर, शंकरराव करांडे, दिगंबर हिप्परकर, शरद हेटकळे, अनिल बाड, युवराज करांडे, दादा सांगोलकर, अशोक हिप्परकर, अमोल क्षीरसागर, महेश खिलारे, धनंजय गोडसे, संभाजी काळेल, महादेव टोणे सर, श्रीकांत चौरे आदी पदाधिकाऱ्यांसह लोणारी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.