Ticker

6/recent/ticker-posts

कौशल्य सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत शिकण्याची गरज... प्रसाद विधाते



बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

कौशल्य आत्मसात केल्यामुळे व्यक्तींना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात प्रभावीपणे कार्य करण्यास मदत होते असे प्रतिपादन  प्रसाद विधाते यांनी केले. कला व वाणिज्य महाविद्यालय पुसेगाव.येथील वाणिज्य  विभाग आयोजित आणि प्रिं एन.जी.नारळकर संस्था, पुणे.  आयोजित 'रोजगार मार्गदर्शन आणि कौशल्य विकास  एक दिवसीय कार्यशाळा ' प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .                        

विधाते आपल्या भाषणात पुढे म्हणाले,'कौशल्य विकासात  शिक्षण, अनुभव, अंत: प्रेरणा हे तीन घटक आहेत. देशातील तरुणांना कौशल्य सहित सक्षम बनवणे हा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे संबंधित क्षेत्रात रोजगार मिळू शकेल आणि उत्पादनात सुधारणा होईल असा विश्वास व्यक्त केला. डॉ. अभय पाठक म्हणाले,'कौशल्य प्राप्त करण्यासाठी  पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांनी एमबीए सारखी पदवी संपादन करून अत्यंत प्रभावी व कार्यक्षमपणे कौशल्य संपादन करता येतात . याविषयीची माहिती सांगितली.

 अध्यक्षीय भाषणात डॉ .एन.डी. लोखंडे म्हणाले,'विद्यार्थ्यां कौशल्य प्राप्त करण्याचे विविध कोर्स करून नवनवीन कौशल्य मिळू शकतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी विशिष्ट क्षमता ज्ञान प्राप्त करण्यासाठी  रोजगार क्षमतेत ,करिअरच्या प्रगतीच्या संधी वाढविता येता‌त. याविषयीची माहिती सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.पी.व्ही.गायकवाड यांनी केले.तर आभार प्रा.एम.एस.यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थीनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.