Ticker

6/recent/ticker-posts

स्पर्धा परीक्षेचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अभ्यासरूपी साधनेची गरज : दिपाली चौगुले



संदिप गावडे @ प्रतिनिधी

      स्पर्धा परीक्षेचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी समर्पित प्रयत्नांची गरज आहे. यासाठी अभ्यासरूपी साधनेची किंवा तपश्चर्याची करावी. असे प्रतिपादन विक्रीकर उपायुक्त श्रीमती दिपाली चौगुले यांनी केले.   येथील आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज येथे आ.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'जयंत करिअर सप्ताह ' अंतर्गत 'करियर संवाद' या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. 

         यावेळी पुढे त्या म्हणाल्या, सध्या वाढत जाणाऱ्या स्पर्धेच्या युगात सातत्यपूर्ण अभ्यास नियोजन करणे गरजेचे आहे. या क्षेत्राबाबत समाजातील गैरसमजांकडे दुर्लक्ष करून आपले ध्येय गाठले पाहिजे. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अभ्यासातील सातत्याबरोबरच प्रयत्नांची पराकाष्ठा गरजेची आहे. तर अध्यक्षीय भाषणात प्र. प्राचार्य अरुण पाटील म्हणाले, की आज स्पर्धा परीक्षा ही काळाची गरज बनली आहे. परंतु वास्तवाशी दोन हात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व क्षमता पणाला लावल्या पाहिजेत. दिखाव्यासाठी अभ्यास न करता टिकण्यासाठी अभ्यास केला पाहिजे.

   यावेळी प्रा. दशरथ पाटील, पौर्णिमा चव्हाण, लता देशमुख,अमित पाटील उपस्थित होते.स्वागत अजित डवरी यांनी तर सूत्रसंचालन नंदकुमार ठोंबरे यांनी केले.