Ticker

6/recent/ticker-posts

उम्मत हेल्पलाईन ची.मागणी सुरक्षा आणि स्वच्छता



 गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी

नगर परिषद, कारंजा लाड, जि वाशीम यांना मूलजी जेठा नगरपरिषद उर्दू शाळेमध्ये नवीन स्वच्छलये बांधकाम करून देणे यासाठी निवेदन सादर केले  आजची सामाजिक अवस्था बघता मुलींवर होणाऱ्या अन्याय आणि सामाजिक विषमता त्यामध्ये मूलजी जेठा नगरपरिषद उर्दू शाळेतील स्वच्छालय याची दुरावस्था, मुलींना स्वच्छालय जायला होतो त्रास ! बाहेरील नागरिकांना दिसते आरपार मूलजी जेठा नगर परिषद उर्दू शाळा असून त्यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी शिकतात या विद्यार्थिनींना आज रोजी सुलभ स्वच्छालय व्यवस्थित रित्या नाही. सुलभ स्वच्छालयाचे व्यवस्था अतिशय दयनीय आहे. मुली जेव्हा स्वच्छालय यामध्ये जातात, तेव्हा बाहेर येईल रस्त्याने वाहतुकी करणाऱ्या लोकांना स्पष्टपणे दिसतात. 

वरील विषयानुसार आपणाला विनंती करण्यात येते की आजची सामाजिक विषमता आणि स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार बघून पुढे अशी कोणती घटना होऊ नये. त्याकरिता शौचालयाला लवकरात लवकर दुसऱ्या ठिकाणी नवीन सुलभ शौचालय तयार करण्यात यावे, जेणेकरून समाजातील गोरगरीब जनतेला आणि शाळेतील जे विद्यार्थी विद्यार्थिनी शिकत आहेत. त्या पालकांना आपल्या मुली सुरक्षित आहे. याची खात्री व्हावी म्हणून आज रोजी सुलभ शौचालय लवकरात लवकर दुसऱ्या ठिकाणी नवीन सुलभ शौचालय तयार करणे गरजेचे आहे. 

आणि जे पहिले स्वच्छलय होत ते स्वच्छलय वाईट झालं मुळे ते बंद करण्यात आले तेच स्वचलंयावर नवीन स्वच्छलये बांधकाम करून देणे ही विनंती करिता शासन प्रशासनावर विश्वास करून आम्ही निवेदन सादर करीत आहोत.निवेदन देते वेडेस शेख युनूस पहेलवान,जुनैद मिर्झा,अफराज जिलानी,तौसिफ़ अकबानी,अहेमद शेख,अब्दुल जुबेर,बबलू शेख,अरबास शेख हे उम्मत हेल्पलाईन चे सर्व सामाजिक कार्यकरता उपस्तित होते.