मालेगांवप्रतिनिधी (जावेद धन्नू भवानीवाले )
मालेगाव :- दि :27जाने 2025भारत स्काऊटस् आणि गाईडस् संस्थेच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षा निमीत्य जय बजरंग विद्यालय, सुकांडा व कोंडबातात्या ढवळे विद्यालय, शिरपूर तालुका मालेगाव येथील दोन पथके त्रीची ,तामिळनाडू जांबोरीला रवाना झाले आहेत.
भारत स्काऊटस् आणि गाईडस् राष्ट्रीय कार्यालयाच्या वतीने डायमंड जुबली जांबोरी, त्रीची तामिळनाडू येथे दि. २८ जानेवारी ते ०३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आयोजीत केलेली आहे. सदर जांबोरीमध्ये वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जय बजरंग विद्यालय, सुकांडा येथील स्काऊटर प्रमोद राठोड व कै. कोंडबातात्या ढवळे विद्यालय, शिरपूर येथील स्काऊटर रामेश्वर सर्जेराव यांच्यासह सदर शाळेतील १६ स्काऊटस् सहभाग घेण्यासाठी रवाना झाले आहेत.
स्काऊट गाईड जांबोरी ही शालेय विद्यार्थ्यातील सुप्त गुणांना वाव देणारे मुक्त व्यासपीठ आहे. स्वावलंबन, शिस्त, परस्पर सहकार्य भावना व निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आवडीनुसार विविध साहस खेळ खेळण्याची संधी मिळते. संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याची त्यांना अनोखी भेट आहे. अशा जांबोरी मधून विद्यार्थ्यांच्या अंगी नेतृत्व गुण वाढीस लागून तो चांगला नागरिक घडतो. भावी जीवनात कुठल्याही घटनेस तो धैर्याने समोर जाण्यास सक्षम होतो. त्यामुळे अशा विविध मेळावे जांबोरी येथे एक वेगळे शिक्षण सात दिवसात अनुभवास मिळते जे की वर्षभर वर्गाच्या चार भिंतीत घेता येत नाही असं प्रत्यक्ष अनुभवातुन शिक्षण त्यांना या जांबोरी येथून सहज मिळते.जांबोरी जाणाऱ्या सर्व स्काऊटस् व स्काऊटर यांचे जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी (प्राथ.) विठ्ठल भुसारे, जिल्हा चिटणीस तथा शिक्षणाधिकारी (माध्य.) आकाश अहाळे, जिल्हा मुख्यालय आयुक्त तथा उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) गजानन डाबेराव, जिल्हा सह चिटणीस ज्योती भाकरे, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त (स्काऊट) डॉ. मुरलीधर जाधव, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त (गाईड) इंदीरा राणे, जिल्हा संघटक (स्का.) वैशाली घोम, जिल्हा संघटक (गा.) मनिषा ढोके इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन करून जांबोरी करीता शुभेच्छा दिल्या. असल्याचे स्काऊट मास्टर विनोद राजगुरू राहणार करंजी लहाने तालुका मालेगाव यांनी माहिती दिली आहे.





Social Plugin