प्रतिनिधी @रामेश्वर तोंडे लोणी गवळी
चिखली - राष्ट्रीय अविष्कार अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद हायस्कूल मंगरूळ नवघरे येथिल प्राविण्य प्राप्त विद्यार्थी धनंजय भारत येळवंडे , वृषभ गोपाल येळवंडे , आर्यन नितीन गाडे , कु . सिध्दी गोपाल गाडे , कु .शितल छगन आंभोरे , कु . मयुरी गजानन आंभोरे व कु .आयुषी सुनिल लहाने यांची निवड करण्यात आली असून सदर विद्यार्थी शाळेच्या विज्ञान शिक्षिका कु . सुनयना नेवारे व श्रीमती कविता उंबरकर यांच्या सोबत राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी तेलंगाना राज्यातील हैद्राबाद येथे दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य वसंतराव गाडेकर यांच्या आदेशाने व विज्ञान शिक्षक रामनंदन केदार यांच्या मार्गदर्शनाखाली रवाना झाले आहेत .
याबाबत सविस्तर असे की , शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी व त्यांच्या सामान्य ज्ञानात वृद्धी व्हावी आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा तसेच विविध स्पर्धा परिक्षांना बसण्यासाठी मुलांना प्रोत्साहन मिळावे व प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळविण्यासाठी इतर राज्यातील शाळा व राज्याबाहेरील ठिकाणी आपल्या जिल्ह्यातील मुलांनी भेटी दिल्यास विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाण - घेवाण तसेच सांस्कृतिक वृद्धीकरण होऊन आनंददायी शिक्षण प्राप्त करण्यास मदत होईल या उदात्त उद्देशाने शासनस्तरावरून समग्र शिक्षा कार्यालयाव्दारे राष्ट्रीय अविष्कार अभियाना अंतर्गत Exposure Visit Outside State हा उपक्रम राबविल्याल्या जातो .
त्यानुसार राज्यस्तरावरून प्राप्त शाळा निवडीच्या निकषानुसार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विजेत्या शाळांची निवड करण्यात आलेली असून
जिल्हा परिषद हायस्कूल मंगरूळ नवघरे येथिल विद्यार्थ्यांनी सन 2023 - 24 या शैक्षणिक सत्रांत NMMS परीक्षा ( National Means Cum Merit Scholarship Scheme Exam ) मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढविली व चिखली तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल जिल्हा निवड समितीकडून सदर अभ्यास दौऱ्यासाठी शाळेची निवड करण्यात आली आहे .
त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची चमू शिक्षकांसह तेलंगाना राज्याच्या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले असून शाळा व्यवस्थापन समिती तसेच शाळेतील सर्व शिक्षक व पालकांकडून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .





Social Plugin