Ticker

6/recent/ticker-posts

पाटण तालुका पत्रकार संघाच्या सर्व नूतन पदाधिकारी निवडी पार अध्यक्ष विलासराव माने उपाध्यक्ष सुरेश सकपाळ व उमेश सुतार


पाटण (दिनकर वाईकर)

  पाटण तालुका पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकारी यांच्या निवडी नुकत्याच पाटण येथे पार पडल्या . अध्यक्ष पदी विलासराव माने, उपाध्यक्ष सुरेशराव सपकल्र्व उमेश सुतार यांची सर्वानुमते निवडी करण्यात आली. कार्याध्यक्ष पदी जयभीम कांबळे, सचिव पदी भगवंत लोहार सह सचिव पदी राजेंद्र सावंत यांची निवडी करण्यात आल्या. निवडीनंतर नूतन पदाधिकारी यांचां शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्ात आला.

राज्य प्रतिनिधी पत्रकार विठ्ठल राव चव्हाण जिल्हा प्रतिनिधी म्हणून राजकुमार साळुंखे , कार्यकारणी मध्ये पाटण विभाग प्रमुख प्रकाश कांबळे मोरगिरी विभाग प्रमुख संदेश बनसोडे तारले विभाग प्रमुख एकनाथ माळी यांची निवड करण्यात आली  प्रेस फोटोग्राफर पदी सुधीर लोहार नानासाहेब पवार खाशाबा चव्हाण सचिन पोतदार यांची निवड करण्यात आली.

पाटण तालुका पत्रकार संघाची बैठक पाटण येथील भाजप कार्यालयात पार पडली प्रारंभी बैठकीत माझी पंतप्रधान डॉ एम मनमोहन सिंह श्रीमती कुसुम पाटील व रेखा भोळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . तदनंतर बैठकीत पत्रकार sanghavhe मावळते अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षेखाली व मावलते कार्याध्यक्ष राजेंद्र लोंढे उपाध्यक्ष नितीन खैरमोडे व योगेश हिरवे यांच्या उपसथितीमध्ये पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी निवड बिनविरोध पार पडली.

निवडी नंतर नवीन अध्यक्ष विलासराव माने म्हणाले विविध सामाजिक कार्यक्रम मुळे पाटण तालुका पत्रकार संघाचा नाव लौकीक सातारा जिल्ह्यात आहे संघाच्या नाव लौकिकाला शोभेल असे काम करून दाखवू, पत्रकार भवनाचा रखडलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी नीच्छितच सर्वांनी मिळून प्रयत्न करूयात. आपण माझी अध्यक्ष पदी निवड करून जो विश्वास दाखविला आहे तो मो सार्थ करेन. या निवडीमुळे माझ्यावरील जबाबदारी नीच्छितच वाढली जाईल ती जबाबदारी पार पाडण्यासाठी सर्व पत्रकारांना सोबत घेवून एकत्रित काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माझी अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी वर्षभरात पाटण तालुका पत्रकार संघाने राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली आहे. यावेळी ज्येष्ठ सदस्य राजेंद्र लोंढे यांनी मार्गदर्शन केले. निवडीनंतर नवीन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला   . बैठकीस पाटण तालुका पत्रकार  सर्व सदस्य व  उपस्थित होते .