प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
संताजी कॉन्व्हेंट मेहकर जि.बुलढाणा दि.३/१/२०२५ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व बालिका दिन साजरा करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने सावित्रीबाई फुले यांच्या चरित्र्यावर प्रकाश टाकण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी भाषण,सांस्कृतिक नृत्य स्पर्धा,वैयक्तीक नृत्य,वेषभूषा, नाटीका साज-या करण्यात आल्या.
यांमध्ये प्रामुख्याने सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका यावर नृत्य सादरीकरण कार्यक्रमचे विशेष ठरले.यामध्ये वर्ग ८ वी विद्यार्थीनी आनंदी तोंडे, श्रुती डोंगरे, श्वेता आदमाने, सृष्टी राऊत,रेणुका ठाकरे सहभाग नोंदविला,यांचे मार्गदर्शक नृत्य शिक्षक अश्विनी लाड मैडम केले होते.
या कार्यक्रमासाठी शाळेचे उपाध्यक्ष संतोषजी राजबिंडे, गोपालजी पाखरे सुनीलजी नालिंदे, प्राचार्या मनीषा राजबिंडे राजबिंडे, उपप्राचार्य विशाल डोंगरे सर,महादेवजी बावरे सर,गवई सर,सासवडकर सर,इंगळे सर,गायकवाड मामा,महाकाळ मामा,किशोर शिंदे ,पालक नागेशजी सोनुने,रामेश्वर तोंडे,रूपेश पाटील इ.शिक्षक, विद्यार्थी व पालक हजर होते





Social Plugin