निलंगा प्रतिनिधी विशाल बिराजदार
तालुक्यातील औराद शहाजानी येथील संस्कृती प्रतिष्ठान संचलित वसंतराव पाटील विद्यानिकेतन शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून डॉ. शारदा जाधव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी राऊ शिंदे यांनी केले. यात अवनी कदम, अनम पटेल, आर्या कुलकर्णी, तन्मय कांबळे, आरोही चामले, श्रद्धा शिंदे आदी विद्यार्थ्यांनी हिंदी, इंग्रजी, मराठी भाषेतून भाषण केले. लहान वर्गातील चिमुकल्या मुलींनी सावित्रीच्या पोशाखात येऊन वातावरणनिर्मिती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वैशाली शिंदे यांनी तर आभार सत्यभामा भंडारे यांनी मानले. यावेळी प्रा. दत्ता माने, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी डॉ. शारदा जाधव म्हणाल्या की, पहिली महिला सावित्रीच्या शिक्षीका सावित्रीबाई फुले यांचे आम्हा मुली व स्त्रियांवर अनंत उपकार आहेत त्यांची उत्तराई मुलींनी खूप शिकून मोठे होऊन, स्वतःचा उध्दार करून, स्वतःसोबत समाजाचेही ऋण फेडावेत. आपण सावित्रीबाई फुले यांच्यापासून जिज्ञासा, कष्ट, धाडस, सेवा आदी गुण होऊन, घेऊन मोठे होण्याची अपेक्षा व्यक्त केली.





Social Plugin