मालेगांव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव :दि :-24/जाने /2024शहर सर्वत्र विद्युत पोलवर चांगल्या प्रकारच्या लाईटची व्यवस्था करणे बाबत सामाजिक कार्यकर्ते सागर अहीर पुढाकार घेऊन नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमुद केल्याप्रमाणे
आपल्या मालेगांव शहरातील नगरपंचायत हद्दीतील संपूर्ण परिसरात लाईटची व्यवस्था नाही. तसेच ज्या ठिकाणी लाईट आहेत ते लाईट रात्रीच्या वेळी पूर्ण परिसर प्रकाशमय करण्यास सक्षम नाही आहेत रात्रीच्या वेळी सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने तसेच शहरातील अंधारमय भितीचे वातावरण कमी करायला आपल्या नगरपंचायत मार्फत संपूर्ण शहरात चांगल्या प्रकारच्या लाईटची व्यवस्था करण्यात यावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते सागर अहिर मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.





Social Plugin