प्रतिनिधी - शैलेश कावळे
लाखांदूर तालुक्यातील मौजा राजनी येथे दि.22 जानेवारी 2025 रोजी. श्री रामलला प्रतिष्ठापना दिवस साजरा करण्यात आला
मागील वर्षी याच तारखेला श्री राम जन्मभुमी अयोध्या नगरी मध्ये व जगात हिंदू धर्म अबाधित रहावा या करिता वर्षानु-वर्षापासून योजीकेले राम मंदिराचे भव्य बांधकाम व श्रीरामलला च्या मूर्तीचे विधिवत प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली त्याचे औचिक्त साधून राजनी गावात कोणत्याही प्रकारचा जात पात व पक्षपात न करता गावात ऐकोपा व प्रभु रामाचे विचार आपल्या हिंदू धर्मात आचरणात राहावे म्हणून प्रभू श्री रामाचे प्रतिष्ठापना दिवस राजनी ग्रामवसीया कडून साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमा प्रीत्यर्थ प्रतिमेचे पूजन रयेत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष मा. ज्ञानेश्वरजी राहुत कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय रोजगार हमी कामगार वेल्फेअर महाराष्ट्र राज्य संघटक मा. देवचंद भाऊ कावळे उपाध्यक्ष ग्रामपंचायत उपसरपंच मा. गोपालजी तऱ्हेकार विशेष अत्तीथी रयेत शेतकरी संघटनेचे जिल्हासचिव मा. मच्छिंद्रजी मावळे ,नवनाथजी ठाकरे ,विनोदजी मस्के , शालिकरामजी ठाकरे , डॉ् सत्तेवानजी ठाकरे , रामचंद्रजी ठाकरे , कलिरामजी ठाकरे ,अविनाशजी ठाकरे ,मा. गुरुदेवजी तिघरे (पोलीस पाटील), ग्रा. प.स. यशवंतजी निंबेकर ,ग्रा.प.चपराशी अरुणजी तिघरे व गावकरी मान्यवर .उपस्थित व मान्यवरांचे मनोगतसह पार पडला .हा दिवस स्मरणात रहावा या करिता मा. नरेशभाऊ ठाकरे (माझी तंटामुक्ती अध्यक्ष) व पुरुषोत्तमजी ठाकरे यांनी ग्रामस्थांचे सहकार्याने प्रभू श्री रामचंद्र. प्रतिष्ठापना दिवस व महिला करिता हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले .व सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता केले.





Social Plugin