प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
मेहकर : - विज्ञान प्रदर्शनी बाल वैज्ञानिकांना दिशा देण्याचे काम करते असे प्रतिपादन आमदार सिध्दार्थ खरात यांनी केले आहे # ५२ व्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात ते उदघाटक म्हणून बोलत होते. येथील भारतीय ज्ञानपीठने तयार केलेल्या रतन टाटा नगरीत विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले आहे. अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव विशाल काबरा तर प्रमुख उपस्थितीत संचालक श्याम राठी, रोहीत इंनानी, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, सहाय्यक गटविकास अधिकारी धीरज जाधव, कृषी विस्तार अधिकारी संदीप मेटांगळे, गटशिक्षणाधिकारी मधुकर वानखेडे, गटसमन्वयक प्रमोद रायमुलकर उपजिल्हा प्रमुख प्रा. आशिष रहाटे, शहर प्रमुख किशोर गारोळे, माजी सभापती सतिष ताजने, युवा सेनेचे अँड. आकाश घोडे, न.प.प्रशासन अधिकारी रामेश्वर सरकटे, शिक्षण विस्तार अधिकारी एस.बी. काळे, बी.एस. सोळंके, सर्व केंद्र प्रमुख, सर्व शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, पत्रकार रफिक कुरेशी, कैलास राऊत उपस्थित होते # आपल्या भाषणात आमदार खरात पुढे बोलले की शिक्षक हा समाजाचा आरसा, चेहरा आहे. ज्ञान देणारे केंद्र आहे. इतिहास बदलण्याची ताकद शिक्षणात आहे. संस्कृती आणि विज्ञान यांच्यात मेळ असल्याने सर्व क्षेत्रात विज्ञान आहे. आपल्या भौतिक गरजा विज्ञानाने पूर्ण केल्या. शेती अत्याधुनिक केली. विज्ञानाची कास धरून आपला विद्यार्थी मोठा झाला पाहिजे. ज्ञानी झाला पाहिजे. आय.टी.क्षेत्रात तो चमकला पाहिजे.
त्याकरिता वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे महत्त्वाचे आहे. यावेळी प्रास्ताविक विज्ञान संघटना तालुका अध्यक्ष जी.एस. पाटील यांनी केले, तर भारतीय ज्ञानपीठ चे मुख्याध्यापक मेहबुब परसुवाले, गटसमन्वयक प्रमोद रायमुलकर यांची भाषणे झाली. प्रारंभी शहरातून ढोल ताशांच्या निनादात, लेझीम पथकासह विज्ञान दिंडी काढण्यात आली. भारत रत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम व रतन टाटा यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. भारतीय ज्ञानपीठ ची माजी विद्यार्थीनी प्रतिक्षा साबळे हिने रांगोळी ने अब्दुल कलाम व रतन टाटा यांचे चित्र काढल्याबद्दल तिचा सत्कार झाला. मान्यवरांनी फित कापून विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन केल्यानंतर ती खुली करण्यात आली. यावेळी आमदार सिध्दार्थ खरात व मान्यवरांनी बाल वैज्ञानिकांशी त्यांच्या उपकरणाबाबत संवाद साधला. यावेळी तालुका विज्ञान संघटनेचे उपाध्यक्ष जी. के. देशमुख व सर्व पदाधिकारी, सदस्य, गटसाधन केंद्र व शिक्षण विभाग कर्मचारी उपस्थित होते. सुरुवातीला विद्यार्थीनीनी स्वागत गीत व स्वागत नृत्य तसेच विद्यार्थ्यांनी विविध शास्त्रज्ञांची वेशभूषा करून सर्वांची मने जिंकली. स्वागत गीत व नृत्याला गटशिक्षणाधिकारी मधुकर वानखेडे यांनी शिक्षण विभागाच्या वतीने तर शिक्षक गजानन म्हस्के यांनी सुद्धा बक्षीस दिले. संचालन प्रदीप जोशी तर आभार पर्यवेक्षक कार्तिक गारोळे यांनी मानले. भारतीय ज्ञानपीठचे शिक्षक मुकेश लाड व सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी यांनी प्रदर्शनी करिता परिश्रम घेतले.





Social Plugin