Ticker

6/recent/ticker-posts

विश्व मंदिर ते डव्हा फाटा रोडचे काम सुरू करा. - आ. भावना गवळी



मालेगाव  प्रतिनिधीजावेद भवानीवाले 


    तालुक्यातील तीर्थ क्षेत्र डव्हा येथील विश्व मंदिर ते डव्हा फाटा रोडचे काम रखडले आहे. या रोडचे काम सुरू करण्यासाठी विधान परिषद सदस्य आमदार भावना ताई गवळी यांनी कार्यकारी अभियंता अकोला व अमरावती यांच्याशी फोन वरून संपर्क साधून या रोडचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे.

     मालेगाव तालुक्यातील श्री श्रेत्र डव्हा येथे रथसप्तमी निमित्त श्री नाथ नंगे महाराज संस्थानच्या वतीने भव्य दरवर्षी रथसप्तमी ला यात्रा भरत असते. यावर्षी ४ फेब्रुवारी २०२५ मंगळवार रोजी भव्य महाप्रसादाचे वितरण होणार आहे. या वेळी महाराष्ट्रातुन, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, मुंबई या जिल्ह्यातील मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येतात. पण डव्हा फाटा ते विश्व मंदीर हा रोडवर खड्डे व रोडची झालेली चाळण पाहता. या रोडवर छोटी मोठी वाहन चालवणे कठीण आहे. त्यामुळे येणाऱ्या भाविक भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी या रोडचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी आमदार भावना ताई गवळी यांनी केली आहे. तर या रोडचे डाग डुगीचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल असे. कार्यकारी अभियंता अकोला - पाटील यांनी सांगितले. तर उर्वरित रोडचे काम यात्रा झाल्या नंतर करण्यात येईल असे यावेळी सांगितले. तर विधान परिषद सदस्य आमदार भावना गवळी यांनी संबधित विभाग कार्यकारी अभियंता अमरावती व अकोला यांना रोडचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी निवेदन द्वारे केली आहे.