Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षणाधिकारी आकाळ; घाटबोरी येथे जिल्हा मेळावा



स्काऊट गाइड चळवळीतून संस्कार आणि शिस्तीचे धडे स्काऊट गाइडने तयार केलेल्या तंबू सजावटीची पाहणी करताना मान्यवर.


प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी 


स्काऊट गाईड ही व्यक्तिमत्व विकास करणारी चळवळ असून या चळवळीतून संस्कार आणि शिस्त यांचे घडे दिले जातात, असे प्रतिपादन माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अनिल आकाळ यांनी केले.

भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाच्या वतीने तसेच माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग व मुख्याध्यापक संघाच्या सहकार्याने आयोजित स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याचे घाटबोरी येथील एमसीडी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दि. १५ जानेवारी रोजी उ‌द्घाटन करण्यात आले. यावेळी आकाळ बोलत होते. याप्रसंगी स्काऊट गाईड मुख्यालय आयुक्त पी. एस. वायाळ, स्काऊट गाईड जिल्हा कार्यालयाचे माजी अध्यक्ष नितीन शिंगणे, स्काऊट आयुक्त आर. यू. शिंगणे, संघटक एस. पी. आठवले, कविता पवार,निलेश राठोड सर, शाळा निरीक्षक प्रकाश अंधारे, एमसीडी इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष संतोष डोंबळे, सरपंच राजकुमार पाखरे, उपसरपंच गणेश नवले, राजेश नवले, विष्णुपंत पाखरे, मुख्याध्यापिका योगिता डोंबळे, विठ्ठल रुक्माई शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव शैलेश सावजी,

गजानन काळे, जुबेर भाई, सरपंच रंजना चव्हाण, धनराज राठोड, गजानन नरवाडे, विष्णू वाकळे,रामेश्वर तोंडे, शिवप्रसाद थुट्टे, राजेश बिडवे, गणेश क्षीरसागर, बगाडे, भोजेकर, दिनेश आपरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्काऊट गाइड जिल्हा मेळाव्यात जिल्ह्यातील अनेक शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या मेळाव्यात तीन दिवस समूह नृत्य, शारीरिक प्रात्यक्षिक, शेकोटी कार्यक्रम, शोभायात्रा, समारोप व बक्षीस वितरण असे कार्यक्रम होणार आहेत. स्काऊट गाइडच्या जिल्हा मेळाव्याला मान्यवर उपस्थित होते.

परिक्षक -प्राचार्य विजय देवडे सर व मनोहर म्हळसणे सर लाभले.