Ticker

6/recent/ticker-posts

अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा मनखेड येथे इयत्ता 10 वी चा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न



कृष्णा पवार @ग्रामीण प्रतिनिधी नाशिक


सुरगाणा - स्नेहबंधन आदिवासी शिक्षण संस्था संचलित अनुदानित आश्रम शाळा मनखेड येथे आज दि.18/02/2025 रोजी इयत्ता 10 वी चा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आजच्या या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गायत्री परिवाराचे अमृत भाई पटेल हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. संस्थेचे अध्यक्षा, कलावती ताई चव्हाण पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राखुंडे, मनिभाई पटेल,मीनानाथ सोनवणे , प्रविन पांड्या, राजसिंग ठाकूर आश्रम शाळेचे प्राचार्य मणियार सर, प्राथमिक मुख्याध्यापक पगार सर, हे होते.. सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते तसेच सर्व शिक्षक,विद्यार्थी यांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वती ,गायत्री माता व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुष्प फुलांनी पूजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना रुमाल पेन व गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार केला. आजच्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक आश्रम शाळेचे प्राचार्य मणियार सर यांनी केले विद्यार्थ्यांना परीक्षेला कसे समोरे जावे, अभ्यास कसा करावा,ताण तणाव विरहित परीक्षा कशी द्यावी,तसेच इयत्ता 10 वी नंतर आपण विविध नवनवीन क्षेत्रात प्रवेश घेऊन आपले जीवन यशस्वी बनविण्याच्या संदर्भात मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन इयत्ता दहावीचा विद्यार्थी निरंजन कोटील याने केले, प्रमुख पाहुणे म्हणून मीनानाथ सोनवणे यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्यात् . संस्थेचे अध्यक्षा कलावती चव्हाण यांनी गायत्री परिवार नाशिक यांना राधा कृष्ण, सरस्वतीमाता यांची मूर्ती भेट दिली ,

 बारे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री राखुंडे साहेब यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेटवस्तू म्हणून देण्यात आली. इयत्ता अकरावीच्या कला व सायन्सच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभ प्रसंगी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना पेन्सिल, पेन, खोडरबर, पट्टी, पॅड म्हणून भेट दिली 

         गायत्री परिवार नाशिक यांच्याकडून मनखेड आश्रम शाळेतील पहिले ते अकरावीतील 316 मुलींना नवीन गणवेश तीन लाख रुपये किमतीचे देण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गायत्री परिवार मनखेड आश्रम शाळेसाठी दिलेल्या भौतिक सुविधा चा उपयोग होतो आहे याची सविस्तर माहिती दिली.

          विद्यार्थ्यांनी कृतज्ञतेतून विद्यालयास एक सुंदर पितळी साडेसात किलो ची समई भेटवस्तू म्हणून दिली .आजच्या या निरोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका निर्मला भोये कुमार व निरंजन कोटील, यांनी केले .मनोगत कु.तेजश्री भरसट ,कु दुर्गा राऊत,कु.रोशन चौधरी, राणी शेवरे, दमयंती भोये , निरंजन कोटील,यांनी केले.तर तेजश्री भरसट इने उपस्थितांचे आभार मानले. आजच्या या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते