Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा येथे समता नगर मध्ये राहणाऱ्या चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू



गुणवंत राठोड कारंजा, लाड प्रतिनिधी. 

 

    कारंजा शहरातील समतानगर येथील रहवासी अब्दुल साबिर ड्राइवर यांचा तीन वर्षीय अरहान नावाचा मुलाचा घरा समोरील खड्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 17) 4 वाजताच्या सुमारास घडली.

कारंजा शहर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून त्याचा चिमुरडा अरमान घराबाहेर चेंडू घेऊन खेळायला गेला. मात्र, बराच वेळ झाला तरी अरमान घरी न आल्याने शोधाशोध सुरू झाली. सर्वत्र शोधल्यानंतर मुलगा मिळाला नाही. दरम्यान घरासमोरील सांडपाण्याच्या खड्ड्यात पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली. जेसीबीच्या सहाय्याने खड्ड्यातील पाणी काढल्यानंतर चिमुकला पाण्यात आढळला. त्याला बाहेर काढून लगेचच उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.  घटनेचा तपास पोलिस सहनिरीक्षक जयदीप पवार यांचा मार्गदर्शनात पीएसआय ठाकरे पोलिस हेडकॉन्स्टेबल सूरज खड़के करत आहे.