Ticker

6/recent/ticker-posts

असंघटीत बांधकाम कामगारांच्या प्रश्नासाठी डीपीआयचे आंदोलन



संदिप गावडे @आष्टा प्रतिनिधी 

        महाराष्ट्रातील असंघटीत बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्यावतीने असंघटित बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने ३१ जानेवारी रोजी आष्टा अपर तहसिल कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

     महाराष्ट्रात कोणत्याही असंघटीत बांधकाम कामगाराला कोणत्याही जिल्ह्याच्या ठिकाणावरुन किंवा घरी बसून सुद्धा त्याला त्यांच्या सुविधा ऑनलाईनवरून घेता याव्यात. यासाठी असंघटीत कामगारांचे ऑनलाईन पोर्टल सुरु करावे. त्यानुसार प्रत्येक तहसीलच्या ठिकाणी सेतू सेवा केंद्र सुरु करून कामगारांचे हित जोपासले जावे. तसेच कामगार हे ग्रामीण भागातील अशिक्षित व कमी शिक्षित असल्याने त्यामध्ये होणारी कामगारांची पिळवणुकही थांबवावी. अशा अनेक मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

             यावेळी अप्पर तहसीलदार लिंबारे साहेब यांनी महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे वाळवा तालुक्याचे अधिकारी ढेंबरे साहेब व सांगली सहायक आयुक्त मुजावर साहेब यांच्यासोबत चर्चा करून ऑनलाईन पोर्टल सुरु करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा व बैठका सुरू असल्याने लवकरच पोर्टल सुरू होण्याची कार्यवाही होईल. तसेच आष्टा या ठिकाणी सेतू सुविधा केंद्र सुरु करण्यात येईल. असे आश्वासनही तहसीलदार यांनी दिले.  

         या आंदोलनाचे नेतृत्व डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे राज्य प्रवक्ता अशोकराव वायदंडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश लोंढे, सांगली जिल्हा अध्यक्ष कबीर चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष संदीप काटे, बाजीरंग सकटे, रेखा कुंभार, वनिता वारे, उज्वला कुंभार, सारिका पाटील, दीपाली मदने, शामराव जाधव, बाजीरंग पडळकर, अरुण लोंढे, अमोल मस्के, ओंकार काटे तसेच डीपीआय असंघटित बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारी व महिला व पुरुष बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.