Ticker

6/recent/ticker-posts

श्री ग्रुपकडून चौंडेश्वरी मंदिरात गणेश जयंतीचे आयोजन



संदिप गावडे @ आष्टा प्रतिनिधी 

      येथील श्री चौंडेश्वरी मंदिरातील श्री गणेश मंदिरात शनिवार दिनांक १ रोजी माघी गणेश जयंती उत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती श्री चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आडमुठे यांनी दिली. 

       यावेळी प्रकाश आडमुठे म्हणाले, आष्टा नगरीचे ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी मंदिरातील गणेश मंदिरात श्री गणेश जयंतीनिमित्त पहाटे ६ वाजता श्रींचा अभिषेक व आरती सकाळी ११ ते १२.३० हभप कृष्णात् कुंभार महाराज यांचे प्रवचन दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी जन्मकाळ पुष्पवृष्टी व त्यानंतर आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

        या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रकाश आडमुठे, प्रदीप पाटील ,अभिनंदन पाटील व सहकारी यांनी केले आहे.