Ticker

6/recent/ticker-posts

कै. काकासाहेब चितळे यांच्या स्मृती दिनानिमित्त जायंटसच्यावतीने मोफत डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर



संदिप गावडे @ प्रतिनिधी

      कै. काकासाहेब चितळे यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त जायंटस् ग्रुप ऑफ आष्टा व जायंटस् ग्रुप ऑफ आष्टा सहेली यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. ११ फेब्रुवारी २५ रोजी मोफत डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 

      जायंटस् ग्रुप व नॅब नेत्र रुग्णालय मिरज यांच्यामार्फत घेतले जाणारे हे शिबीर मंगळवार, दि.११ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ ते २ यावेळेत डॉ.बापट यांचे चैतन्य क्लिनिक येथे होणार आहे. या शिबिरात गरजू नेत्र रुग्णांच्या सोयीकरीता मोफत नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया, मोतिबिंदूसाठी नेत्रभिंगारोपण शस्त्रक्रिया, बिन टाका शस्त्रक्रिया (मशिनच्या सहाय्याने ) काचबिंदू, लासस, डोळ्याची प्लास्टिक सर्जरी व तिरळेपणा यांचे योग्य निदान व उपचार तसेच बिनटाक्याची मोतिबिंदू शस्त्रक्रिया लेन्स बसवून संपूर्णपणे मोफत मिळणार आहे. तर फेको शस्त्रक्रिया अल्पखर्चात करण्यात येईल. 

     तरी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक जायंटस् ग्रुप ऑफ आष्टाचे अध्यक्ष सुनिल माने (काका), कार्यवाह सुनिल सावंत, जायंटस् ग्रुप ऑफ सहेलीच्या अध्यक्षा दमयंती इंगळे, कार्यवाह सुनंदा जुगदर, मार्गदर्शक डॉ. सतीश बापट यांनी केले आहे.