मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून काम केल्याची मिळाली पावती -शिरपूर जैन -शिरपूर पासून जवळच असलेल्या किन्ही घोडमोड येथे जि प उच्च प्राथमिक शाळेवर कार्यरत असलेले पदविधर शिक्षक संजय सुरेकर यांचा २६ जानेवारी रोजी उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून काम केल्याची पावती म्हणून मा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
किन्ही घोडमोड येथे संजय सुर्यभान सुरेकर हे पदवीधर शिक्षक म्हणून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे कार्यरत असून त्यांच्याकडे किन्ही घोडमोड चे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी त्यांच्या शैक्षणिक कामकाजा सोबत मतदार यादीचे शुद्धीकरण करून मतदार यादी अधिक बिनचूक केली,तसेच नव मतदार नोंदणी व मयत, दुबार,कायम स्थलांतरित मतदार वगळणीचे व आधार जोडणीचे कार्य १००% पूर्ण केले तसेच मतदान जनजागृती बाबत वेळोवेळी विविध उपक्रम राबवले व नागरिकांनी जागृत केले.संजय सुरेकर यांनी तहसीलदार दीपक पुंड, ना तहसीलदार सुनील देशमुख, ग्रा. महसूल अधिकारी ना ना इढोळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे मतदान केंद्र किन्ही घोडमोड येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये ८०.३६% तर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये ८४. ८९% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संजय सुरेकर यांचे कार्य कौतुकास्पद व इतरांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.त्यामुळे त्यांना विभागीय पातळीवर पुरस्कृत करून २६ जानेवारी रोजी मा हसन मुश्रीफ पालकमंत्री जि वाशीम यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मा पालकमंत्री हसन मुश्रीफ, बुवणेश्वरी एस.जिल्हाधिकारी वाशीम,अनुज तारे पो अधीक्षक,वैभव वाघमारे मुख्य कार्यकारी अधिकारी,उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांची उपस्थिती होत





Social Plugin