Ticker

6/recent/ticker-posts

श्रीक्षेत्र डव्हा यात्रेनिमित्त एस टी महामंडळाची बस सेवा उपलब्ध



मालेगाव प्रतिनिधी (जावेद धन्नू भवानीवाले )

मालेगाव दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी मालेगाव तालुक्यातील श्री नाथ नंगे महाराज श्री क्षेत्र डव्हा यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने विविध ठिकाणतुन दर्शनसाठी येणाऱ्या भविक भक्त साठी एस टी महामंडळ मालेगाव यांच्या कडून दि03/02/2025 ते 05/02/2025 पर्यंत बस सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे वेळ सकाळी 08 ते रात्री 10 पर्यंत मालेगाव ते डव्हा या मार्गाने दोन रूटवर बस सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

डव्हा यात्रोत्सवास येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून वाशिम आगारातून पाच बसेस आणि मंगरूपीर आगारातून दोन एकूण सात बसच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त प्रमाणात भाविक भक्तांनी बस सेवेचा लाभ घेऊन आपले प्रवास सुखकर आणि सुरक्षित पद्धतीने अनुभवावे असे आहवान व माहिती वाहतूक नियंत्रण अधीकारी मालेगाव रवी चव्हाण यांच्याकडून देण्यात आली. आहे