Ticker

6/recent/ticker-posts

अध्यक्षपदी पी. पी.पप्पूवाले यांची निवड


 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

 दिग्रस : दिग्रस तालुका पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार पी.पी. पप्पूवाले, तर सचिव पदी युवा पत्रकार जय राठोड यांची बिनविरोध निवड झाली आहे. शनिवार दिनांक 22/ 2/ 2025 रोजी झालेल्या सभेत तालुक्यातील सर्वात जुन्या पत्रकार संघटनेची नवीन कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली. दिग्रस तालुका पत्रकार संघटनेची सभा नुकतीच पार पडली. ज्येष्ठ पत्रकार पुंडलिकराव इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत विविध विषयावर चर्चा झाली. त्यानंतर सर्वानुमते नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

 यामध्ये पी.पी. पप्पूवाले( अध्यक्ष) आणि जय राठोड( सचिव) यांच्यासह किशोर कांबळे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून धर्मराज गायकवाड, सहसचिव म्हणून कपिल इंगोले, कोषाध्यक्ष म्हणून अजिज शेख,तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून जुबेर हबीब खान यांची निवड करण्यात आली. अनिल राठोड यांची ग्रामीण प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. मार्गदर्शक मंडळात आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू श्रीचंद राठोड, उद्धव अंबूरे, गोपाल शाह,पुंडलिकराव इंगोले यांचा समावेश आहे. तर मजहर अहेमद खान, यशवंतराव सुर्वे, अजीम खान, सुरेश चिरडे,फारुख अहेमद,अब्दुल रफिक शेख, अफजल खान, आनंद आडे, आमीन चव्हाण, काशीफ मिर्झा,अमीन भाई,शारीक शेख हे सभासद आहेत. दिग्रस तालुका पत्रकार संघटना ही सुमारे 85 वर्षांपूर्वी स्थापन झालेली तालुक्यातील सर्वात जुनी संघटना आहे.