Ticker

6/recent/ticker-posts

वार्षिक स्नेहसंमेलनचे आयोजन

 


24 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा परिषद मराठी आदर्श उच्च प्राथमिक शाळा रायगाव येथे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वार्षिक स्नेहसंमेलनचे आयोजन

 श्री संत खटकेश्वर बाबा संस्थान च्या प्रांगणात करण्यात आले होते सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अप्रतिम असे नृत्य सादर केले त्यामध्ये एकदंत एकदंत माझ्या पप्पांनी गणपती आणला ये प्रयागराज है. नाटिका देशभक्तीपर गीत कोळी नृत्य गोंधळ व अंधश्रद्धा निर्मूलन नाटिका मूकनाट्य याप्रमाणे विविध कार्यक्रम बाल चिमुकल्यांनी सादर केले कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे गावातील सर्व लहान थोर मंडळी पूर्ण वेळ उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे उद्घाटन गावच्या सरपंचसौ लता रामराव नागरे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद देवकते व निवृत्ती मेजर श्री उत्तमराव नागरे यांनी केले तर प्रमुख उपस्थिती म्हणून सर्वांचे आवडते गटशिक्षणाधिकारी श्री जंगलसिंग राठोड याचप्रमाणे जि प आदर्श शाळा टिटवी चे मुख्याध्यापक विजय सरकटे सर सहा अध्यापक श्री अमोल मुसदवाले सर श्री उमायो मोरे बीआ रसी चे नागेश कदम  सावरगाव मुंडे तांडा शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा लगड मॅडम याप्रमाणे यशस्वी कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील पवार सर सूत्रसंचालन कंकाळ सर व सोळंके सर सर्व गाण्यांना विशेष कोरीओग्राफ श्री यादव डोळे सर व कुमारी आव्हाड मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री सुनील पवार सर यांनी केले तसेच कार्यक्रमाला गावातील महिला पुरुष व शाळेतील विद्यार्थी तसेच तरुण युवक उपस्थित होते