Ticker

6/recent/ticker-posts

संस्थेतील २१०० विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी; २१७ विद्यार्थ्यांना चष्मे वाटप



                                 संस्कृति संवर्धन मंडळ व व्हिजन स्प्रिंगचा उपक्रम. 

देगलूर - प्रतिनिधी - जावेद अहेमद 

वातावरणातील प्रदूषण, संगणक व मोबाईलचा अतिवापर  यामुळे दृष्टीदोष मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतात. विशेषतः मुलांमध्ये मोबाईलचा अतिवापर व वाढत्या वयोमानानुसार डोळे क्षीण होत असतात, अनेक नेत्रविकार जडतात यासाठी वेळेवर तपासणी व वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. परतू ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक  याकडे दुर्लक्ष करतात. विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती, योग्य तपासणी व उपचार मिळावे यासाठी सगरोळी (ता.बिलोली) येथील संस्कृति संवर्धन मंडळ व पुणे येथील व्हिजन स्प्रिंग या संस्थेने प्रशालेतील एकवीसशे विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करून दोनशे सतरा विद्यार्थ्यांना चष्मे वाटप केले. 

 सगरोळी (ता.बिलोली) येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालय, श्री छत्रपती शिवाजी ज्युनिअर बेसिक स्कूल, मिलेनिअम इंग्लिश स्कूल व शेळगाव (ता.देगलूर) येथील प्रशालेतील दोनहजार एकशेदहा विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करून दृष्टीदोष आढळलेल्या दोनशे सतरा विद्यार्थ्याना चष्मे देण्यात आले. 


 व्हिजन स्प्रिंग या संस्थेचे डॉ. मनोज सोळंकी, डॉ. मनीष यादव, डॉ. अश्विनी   वाकुडकर व  डॉ. प्रतीक्षा पाटील यांनी विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली. तत्पूर्वी  प्रार्थना सभेत डॉ. अश्विनी  वाकुडकर व  डॉ. मनोज  सोळंकी यांनी आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी व डोळ्यांच्या आरोग्यासाठी कोणता आहार घ्यावा याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.  प्रशालेने घेतलेल्या या उपक्रमाबद्दल अनेक पालकांनी  समाधान व्यक्त केले.