Ticker

6/recent/ticker-posts

पर्सिस्टंट कंपनीकडून मुलींच्या शाळेला दोन लॅपटॉप प्रदान...



दुधगांव.निखिल नलवडे -ग्रामीण प्रतिनिधी-

जिल्हा परिषद मुलींची शाळा नं. 2 दुधगांव शाळेला पर्सिस्टंट कंपनीकडून दोन लॅपटॉप भेट स्वरूपात देण्यात आले. याप्रसंगी पर्सिस्टंट व्यवस्थापक व दुधगाव चे सुपुत्र श्री. रमेश रावळ, सागर रावळ, अध्यक्ष समीर जमादार, शिक्षक संदिप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना संदीप पाटील यांनी आजच्या काळात संगणक शिक्षण अतिशय महत्त्वाचे अधोरेखित करत शालेय जीवनात संगणक ज्ञान मिळावे यासाठी पर्सिस्टंट कंपनी आणि श्री. रमेश रावळ यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल कौतुक केले. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना पर्सिस्टंट कंपनीचे व्यवस्थापक श्री. रमेश रावळ यांनी सदर संगणक वापर विद्यार्थिनींना डिजिटल तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी शिक्षकांनी वापरावा. अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी श्री. रमेश रावळ यांचा सत्कार अध्यक्ष समीर जमादार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिक्षिका सौ. शोभा गावडे मॅडम व श्रीमती शुभांगी परबकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. अजित कांबळे यांनी केले.