Ticker

6/recent/ticker-posts

माळवाडीच्या योगेश मगदूम याची समाज कल्याण अधिकारी पदी निवड.



निखिल नलवडे-ग्रामीण प्रतिनिधी

दुधगाव: १२/२/२५

एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये माळवाडी तालुका मिरज येथील संजय मगदूम यांचे सुपुत्र योगेश मगदूम याने हे यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्यात ४ था क्रमांक त्याने मिळवला असून त्याची समाज कल्याण अधिकारी पदी निवड झाली आहे. त्याने रात्र-दिवस व खडतर प्रयत्न करून, जिद्द आणि चिकाटीने हे यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामध्ये आई, वडील, बहीण, मामा आणि मित्र परिवार यांची मोलाची साथ त्याला मिळाली आहे. या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.