बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव
अतिवृष्टीचे ४१२ कोटी रुपये मंजुर अनुदान तात्काळ वाटप करा,मंजूर झालेला २७० कोटी रुपयांचा खरीप अग्रीम पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.३१ जानेवारी शुक्रवार रोजी धरणे आंदोलन कऱण्यात आले.
पिक विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, सातबारा कोरा झालाच पाहिजे,कोण म्हणतो देत नाही,घेतल्याशिवाय राहत नाही',' या नाकरत्या प्रशासनाचा धिक्कार असो धिक्कार असो,' 'शेतकरी एकजूटीचा विजय असो', अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.
यावेळी कृषी उपसंचालक संजय कायंदे, युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी प्रतिनिधी शेखर कापले, फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनीचे सफर शेख यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, जिल्हा सचिव पांडूरंग गटकळ, युवा जिल्हा उपाध्यक्ष निवृत्ती घुगे, आंदोलन प्रमुख नामदेव निहाल,जेष्ठ नेते अंकुश तारख, बाबासाहेब दखणे, भारत उंडे, बंडूभाऊ शिंगटे,परतुर तालुका अध्यक्ष गणेश राजबिंडे, अंबड तालुका अध्यक्ष उमेश पाष्टे, बदनापुर तालुका अध्यक्ष नरेश फटाले, तात्याराव गोरे, राजेंद्र सिनगारे, योगेश सिनगारे, रामेश्वर फुटाले, सुरेश धोत्रे,बाबासाहेब रोडे, देविदास होळे,राम काकडे, देविदास खुळे,डी.बी.खुळे आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.यावेळी गोपनीय शाखेचे हेड कॉ. शौकत सय्यद व आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
.jpg)




Social Plugin