बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दि . ३० जानेवारी रोजी संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते.त्यानुसार रयत शिक्षण संस्थेचे, पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयतील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सकाळी अकरा वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हुतात्मा दिन साजरा करण्यात आला.
प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी. भोसले , उपप्राचार्य डॉ. ए.एस.जगताप, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद, प्रा.डॉ. संजय क्षीरसागर, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.के.जी.कुंभार व प्रा.एच.जी. निमसे उपस्थित होते. हुतात्म्यांनी जोपासलेल्या अहिंसा, राष्ट्रभक्ती इ.नि: स्वार्थ सेवेच्या मूल्यांचा विद्यार्थीच्या मनावर परिणाम होऊन त्यांच्यात देशभक्तीची भावना वाढीस लागते. आणि स्वातंत्र्य सैनिकांविषयी आदर निर्माण होतो.त्यामुळे विद्यार्थीना भारताच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या बलिदानांची जाणीव होते. आणि राष्ट्रवाद, लोकशाही मूल्ये बळकट होतात.महाविदयालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले व रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद प्रा.डाॅ.संजय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





Social Plugin