मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगांव : - कोचिंग क्लासेस असोसिएशनचे चौथे राज्यस्तरीय अधिवेशन पुणे येथे पार पडले त्यामधे मालेगाव येथील चाणक्य कोचिंग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रा.विशाल घुगे यांना राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार मिळाला आहे आहे राज्यस्तरीय या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड होणे,हे त्यांच्या कठोर परिश्रम,समर्पण,आणि शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय कार्याची साक्ष देणारे आहे प्रा.विशाल घुगे सरांनी आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत .
त्यांनी विद्यार्थ्यांना नवा दृष्टिकोन दिला असून,त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणास्त्रोत बनले आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात आले आहे,हे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे,तर संपूर्ण समाजासाठी गौरवास्पद आहे कोचिंग क्लासेस असोसिएशन कडून प्रा. विशाल घुगे यांना मनःपूर्वक अभिनंदन देण्यात येत आहे त्यांच्या या यशाबद्दल सगळ्यांनाच अभिमान आहे प्रा. विशाल घुगे या पुरस्काराच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे आणि हे त्यांचे प्रेरणादायी कार्य भविष्यातही विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभासारखे ठरेल





Social Plugin