Ticker

6/recent/ticker-posts

तंबाखूच्या भट्टीत पडून तरुणाचा गुदमरून मृत्यू



बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.                            

        बिलोली तालुक्यातील सावळी येथील तरुण शेतकरी राहुल सुरेश देवकरे (वय 27) यांचा तंबाखू धूर देणाऱ्या भट्टीत पडल्याने गुदमरून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना दिनांक 27 फेब्रुवारी रोजी पहाटे घडली.             

 राहुल देवकरे हे मागील वर्षापासून गावातीलच रमाबाई देवकरे यांची शेती एक वर्षापासून कौल करत होता. कौल केलेल्या शेतात तंबाखूचे उत्पादन घेऊन तंबाखूस भट्टी करून धूर देत असताना मध्यरात्री १ सुमारास अचानक तोल जाऊन तो भट्टीत पडला यात धुराच्या वाफेमुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला. अत्यंत हालाखीची परिस्थिती व घरचा कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर मोठा संकट कोसळले आहे.                                     

    घटनेची माहिती बिलोली पोलीस ठाण्याला कळताच पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या आदेशान्वये सावळी बीट जमादार कुमारप्रसाद गायकवाड, ए. जी. शिंदे व पोलीस पाटील बालाजी कंदमवार यांनी धाव घेत घटनेचा पंचनामा केला कुंडलवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील भाऊ असा परिवार आहे.