Ticker

6/recent/ticker-posts

मुंगळा येथील कायमस्वरूपी दारू बंदीसाठी ठाणेदार चौधरी यांना निवेदन!



मालेगांव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 


   मालेगाव : तालुक्यातील मुंगळा येथील दारू मुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्धवस्त व बरबाद झाले असून दारू पाई अनेक जीव ही गेले आहेत यामुळे मुंगळा गावाची कायमस्वरूपी दारूबंदी करण्याकरिता श्रीसंत गाडगेबाबा दारूबंदी विचार मंच अभियानाचे अध्यक्ष अनंता कुटे याच्या वतीने ठाणेदार चौधरी यांना निवेदन देवून करण्यात आली.

    या निवेदनात मुंगळा बिट अधिकारी यांची तडका फडकी बदली करून येथे कर्तव्यदक्ष अधिकारी यांची नेमणूक करून मुंगळा येथील कायमस्वरूपी दारूबंदी करण्यासाठी मालेगाव पोलीस स्टेशन ठाणेदार संजय चौधरी साहेब यांना लेखी निवेदन देण्यात आले.मागील एक ते दिड वर्षांपासून मुंगळा येथील कायमस्वरूपी अवैध दारू धंदे बंद करण्यात यावे याकरिता सामाजिक भावनेतून मागणी निवेदन, विनंती अर्ज, ग्रुप, प्रिंट मिडिया इलेक्ट्रॉनिक मिडिया मधुन दररोज सदर सुरू आहे मागणी केली जात आहे. येथील दारूचा एवढा अतिरेक झाला असून येथे खुलेआम दुध थैल्यातुन अवैध दारू विक्री केली जात आहे. यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्धवस्त झाले असून नवीन पिढीतील मुले दारू व्यसनाच्या विळख्यात सापडली जात आहेत. 

पोलीस प्रशासनाकडून अनेक वेळा दारू विक्रेत्यावर केसेस दाखल केलेल्या आहेत. परंतु कायमस्वरूपी दारूबंदी करण्यात पोलीस प्रशासनाला आजपर्यंत यश आले नाही हे एक न समजणारे कोडे आहे. पोलीस प्रशासन दारू बंदी करण्यात अपयशी ठरली का? मुद्दाम दारू बंद झाली नाही पाहिजे असे पोलीस प्रशासनाला वाटत आहे असे गावकरी बोलत आहेत. यामुळे श्रीसंत गाडगेबाबा दारू बंदी विचार मंच चे अध्यक्ष अनंता कुटे याच्या वतीने दि. २४ फ्रेबुवारी रोजी मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय चौधरी साहेब यांना निवेदन देऊन दारू बंदी न होण्याचे कारणे निदर्शनास आणून दिली आहे. तसेच या बिटचे जमादार व काॅनेष्टेबल याची तडकाफडकी बदली करण्यात यावी व मुंगळा बिटला नवीन खमक्या व कर्तव्यदक्ष अधिकारी देऊन मुंगळा गावाचा कायमस्वरूपी दारू बंदी चा प्रश्र निकाली काढण्यात यावा व मागील दिर्घकाळा पासुन कायमस्वरूपी दारूबंदी ची मागणी होत आहे. या अनुषंगाने मालेगाव तालुक्यातील फक्त मुंगळा गावाला मुंबई दारूबंदी अधिनियम १९४९, कलम १४३ च्या पोट कलम (३) अंतर्गत तरदुत करावी दारू बंदी प्रतिबंध मध्ये समाविष्ट करावे हि विनंती करण्यात आली आहे यावेळी सांध्य दैनिकाचे संपादक अनिल बळी यांच्या हास्ते निवेदन देण्यात आले आहे.