Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. आर. एन लाहोटी बी फार्मसी महाविद्यालयामध्ये सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळेला सुरवात.



 महेश देशमुख @ ग्रामीण प्रतिनिधी मेहकर 


सुलतानपूर : स्थानिक डॉ. आर. एन लाहोटी बी फार्मसी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी विकास विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती व डॉ.आर. एन लाहोटी बी फार्मसी महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने सॉफ्ट स्कल कार्यशाळा 10ते 13फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.

या कार्यशाळेमध्ये बी. फ़ार्म अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असून त्यांना ग्रुप डिस्कशन, रिड्युम प्रयटिंग, इंटरव्यू स्किल, प्रेझेंटेशन स्कल, कम्युनिकेशन स्किल, करेक्टर, नॉरल, मोटिवेशन अशा विविध स्किल्स मॉडयूलवर विद्यापीठीय मार्गदर्शक ट्रेनर डॉ. राजू ठेंगे मलकापूर , प्रा. सौरभ गायकवाड, लोणार प्रा. ज्ञानेश्वर कव्हर वाशीम,प्रा. ए. टी. वाघ वाशीम यांची मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. सदर कार्यशाळेचे उद्घाटन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचेअध्यक्ष शिक्षण महर्षी संजयजी लाहोटी यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदू कायंदे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक  विभाग प्रमुख प्रा. डॉ. रवींद्र सरकटे यांनी केले. उ‌द्घाटनपर मार्गदर्शनात प्राचार्य नंदू कायंदे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या सरळ साध्या प्रभावी वक्तृत्व शैलीने सॉफ्ट स्किल्सची उपयोगिता, हार्ड स्किल व सॉफ्ट स्किल या संदर्भामध्ये मार्गदर्शन केले. प्रथम दिवशी प्रा. डॉ. राजू ठेंगे सर डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी मलकापूर यांचे मार्गदर्शन विद्यार्थीना लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी सास्ते हिने केले यावेळी प्रा. डॉ. आशिष नवघरे,प्रा. डॉ. रवींद्र सरकटे,प्रा. डॉ अरुण मांटे प्रा. डॉ. नितीन लोढे प्रा. विठ्ठल नालेगावकर प्रा. गणेश दिवटे आदी उपस्थित होते , आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.