Ticker

6/recent/ticker-posts

निकिता देवळेकरची मुंबई कारागृह पोलीस दलात निवड



दुधगाव: महाराष्ट्र शासन मुंबई कारागृह पोलीस दलातर्फे जानेवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या मुंबई कारागृह परीक्षेमध्ये निकिता देवळेकर दूधगाव तालुका मिरज येथील बबन देवळेकर यांची कन्या कु. निकिता बबन देवळेकर हिने वयाच्या २० वर्षी हे यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्यात इतर मागास प्रवर्ग मध्ये राज्यात द्वितीय नंबर व खुला प्रवर्गमध्ये राज्यात ६ वा क्रमांक तिने मिळवला असून तिची मुंबई कारागृह पोलीस दलामध्ये निवड झाली आहे. तिची घरची परिस्थिती अगदी बेताची आहे. तिचे आई वडील शेती करतात. तिने रात्र-दिवस व खडतर प्रयत्न करून, जिद्द आणि चिकाटीने हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशामध्ये मेजर धोंडीराम नलवडे, आई, वडील, मित्र परिवार यांची मोलाची साथ तिला मिळाली आहे. या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.