ग्रामीण प्रतिनिधी @समाधान भुतेकर ईसरूळ
देऊळगाव घुबे - शेळगाव अटोळ - इसरुळ - बायगाव रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम सुर करण्यात यावे या मागणीसाठी शेळगाव अटोळ इसरुळ रोडवर मंगरुळ फाट्या जवळील संत चोखोबाराय मंदिरा समोर सतीश भुतेकर सरपंच इसरुळ, बाळू मिसाळ सरपंच मिसाळवाडी, संतोष बोर्डे सरपंच शेळगाव अटोळ यांचेसह राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ यांनी मागील तीन दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते त्या आंदोलनाची आज माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे , सार्वजानिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता काळे साहेब , ठाणेदार पाटील साहेब आणि परिसरातील ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि विवीध पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून उपविभागीय अभियंता सार्वजानिक बांधकाम उपविभाग देऊळगाव राजा यांच्या लेखी आश्वासने आंदोलनाची सांगता करण्यात आली
याबाबतीत साविस्तर वृत्त असे की शेळगाव अटोळ इसरुळ बायगाव रस्ता डांबरीकरणाचे काम तात्काळ सुर करण्यात यावे तसेच देऊळगाव घुबे शेळगाव अटोळ रस्ता काम दर्जेदार व जलदगतीने करण्यात यावे अन्यथा दिनांक 17/2/25 पासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येईल या मागण्याचे निवेदन राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस डॉ विकास मिसाळ , इसरुळ चे सरपंच सतीश पाटील भुतेकर , शेळगाव अटोळ चे प्रभारी सरपंच संतोष बोर्डे, मिसाळ वाडीचे सरपंच बाळू पाटील मिसाळ यांनी सा. बां. विभाग बुलडाणा यांना दिनांक 3/2/25 रोजी दिले होते. शेळगाव अटोळ इसरुळ रस्ता कामाच्या कर्यारंभ आदेशाची मुदत संपली तरी पण अजुन पर्यंत संबंधित कंत्राटदार यांचेकडून डांबरीकरण कामाला सुरुवात करण्यात आली नव्हती सार्वजानिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदार हे या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता तसेच तालुक्याच्या ठिकाणी जाताना वाहन धारकांना तारेवरची कसरत करत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता
सदर कामासाठी तत्कालीन आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी कोट्यवधी रुपये मंजूर करून आणले असताना देखिल केवळ सबंधीत विभागाच्या हलगर्जी पणामुळे काम पुर्ण झाले नसल्याने परिसरातील लोकप्रतिनिधी यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते आज सार्वजानिक बांधकाम विभाग यांचेकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली तसेच हे काम विनाखंड सूरू ठेवून काम पुर्ण करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन कर्त्यानी आपले आंदोलन मागे घेतले याप्रसंगी माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे, सार्वजानिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता काळे साहेब, ठाणेदार विकास पाटील साहेब , उपविभागीय अभियंता वाघ साहेब , कनिष्ठ अभियंता भाले साहेब , बडे साहेब , माजी सभापती सचिन शिंगणे , माजी उप सभापती राजीव जावळे, माजी पं.स.सदस्य सुनील खेडेकर , माजी संचालक मनोज खेडेकर, गजानन वायाळ, संजू खेडेकर, भिकाजी खेडेकर व परिसरातील उपसरपंच, ग्रा. पं.सदस्य , विविध पक्षाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते





Social Plugin