अंबड तालुका प्रतिनिधी मयूर वाव्हळ
शहरातील फैसलाबाद कॉलनीत राहणारी तीन वर्षीय बालीका इकरा अमजद मनीयार ही बेपत्ता झाल्याने तीचा शोध लावण्याच्या मागणीसाठी अंबड शहरातील सर्व समाज रस्त्यावर उतरला शुक्रवार (३१) रोजी दुपारी अकरा वाजता हबीब हसन चौक येथुन मोर्चा काढण्यात आला. मोर्चा नाश्रेकर चौक, महाराष्ट्र द्वार, डॉ बाबासाहेव आंबेडकर पुतळा, बस स्थानक मार्गे तहसील कार्यालयावर धडकला. व मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी नायब तहसीलदार उढाण यांना निवेदन देण्यात आले.
या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १२ जानेवारी २०२५ रोजी अंबड येथील फैसलाबाद कॉलनीमधील इकरा अमजत मनियार या ३ वर्षीय चिमुकलीचे दुपारी ३.०० ते ४,०० वाजेच्या सुमारास अज्ञाताकडुन अपहरण करण्यात आले. सदर घटनेस १९ दिवस झाले आहे. आजपर्यंत सदर मुलीचा शोध लागलेला नाही.
• सदर घटनेमुळे अंबड शहरातील पालकामध्ये दहशतीचे वातावरण आहे, गुन्हा दाखल होउनही या प्रकरणात शोध लागलेला नाही. या प्रकरणाबाबत पोलीस प्रशासन उदासिनता दिसुन येत आहे. चिमुकल्याच्या अपहरणाची उच्च स्तरीय चौकशी करुन प्रकरण सीरायडी व एसआयटी कडे वर्ग करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके, भाजपाचे सुरेश गुढे, वकिल संघाचे लक्ष्मण गायके, उपनगराध्यक्ष जाकेर डावरगावकर, नगरसेवक गंगाधर वराडे, फेरोज शेख, अर्जुन भोजने, राहुल खरात यांच्यासह बरेचसे कार्यकर्ते व सर्व जाती धर्माचे समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच अंबड शहरातील व्यापारी यांनी आपल्या दुकानात बंद ठेवून कडकडीत बंद देखील पाळण्यात आला.





Social Plugin