Ticker

6/recent/ticker-posts

जात प्रमाणपत्र देण्यासाठी सहायक महसूल अधिकाऱ्याने घेतली लाच



अंबड तालुका प्रतिनिधी मयूर वाव्हळ 

जात प्रमाणपत्र काढून देण्यासाठी २ हजाराची लाच स्वीकारताना सहायक महसूल अधिकारी लाचेच्या जाळ्यात अडकला आहे. देवानंद कारभारी डोईफोडे (सहायक महसूल अधिकारी, नेमणूक उपविभागीय अधिकारी कार्यालय, अंबड) असे संशयित लाचखोराचे नाव आहे. डोईफोडे यास ६६ हजार वेतन होते. तक्रारदाराने त्यांच्या मुलाचे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी लागणारी ५७ रुपये फिस तक्रारदार यांनी ऑनलाइन पद्धतीने भरली होती. कागदपत्रांची पूर्तता करून यातील आरोपी डोईफोडे लोकसेवकाने शासकीय फी व्यतिरिक्त स्वतःकरिता दोन हजार रुपयांची लाच मागणी केली.

ही रक्कम स्विकारताना त्याला पकडले आहे. आरोपीच्या अंग झडतीत लाच रक्कम २ हजार रुपये व्यतिरिक्त १ लाख ७७ हजार मिळून आले. आरोपीताने सदर रकमेबाबत कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण दिले नसल्याने सदरची रक्कम पुढील तपासकामी जप्त करण्यात आली आहे. घर झडती करताना व्हिडिओ शूटिंग करण्यात आलेले आहे. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपीतास अटक करून तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. आरोपी यांचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून, कारवाई उपअधीक्षक बाळू जाधवर, पोलिस निरीक्षक शंकर मुटेकर, गजानन खरात, अतीश तिडके, गणेश भुजाडे, गजानन घायवट आदींनी केली आहे.