Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघाची विशेष साधारण सभा संपन्न



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघाची विशेष साधारण सभा शिर्डी येथे पार पडली .  सभेचे आयोजन राज्य अध्यक्ष श्री. मोहनराव शिंगटे पाटील व राज्य महासंघाचे सर्व पदाधिकारी यांनी केले होते. सभेच्या प्रारंभी सातारा जिल्हा अध्यक्ष स्व. रमेश पाटील महासंघाचे राज्य संचालक सिध्दार्थ साळुंखे यांना श्रध्दांजली वाहील्यानंतर साईबाबांच्या फोटोचे पुजन करण्यात आल्यावर सभेचे कामकाज सुरु केले. राज्य कार्यकारणीवर घ्यावयांच्या नावाची चर्चा करण्यात आली . महाराष्ट्र सरकारचा अभिनंदन ठराव समत केला . महासंघ शासन मान्यता मिळवण्यासाठी पाठपुरावा करणे. फेब्रुवारी अखेर सभासद नोंदणी जास्तीत जास्त करणे. वार्षिक वर्गणी जमा करणे. मार्चमध्ये नवीन जिल्हा अध्यक्ष निवडणे. 

सर्व विषय खेळीमेळीत पार पडले यानंतर उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांचा शाल पुष्पहार देवून काहींना सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. यावेळी उल्हास मेढे, धनराज बलवीर, कुमार पंडीत, समोर डाखोळे, किशोर सावंत यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषण शिंगटे पाटील यांनी केले. सभेसाठी राज्य उपाध्यक्ष धनराज बलवीर विभागीय अध्यक्ष किशोर सावंत, गणेश हटवार, नारायण पाटील, प्रमोद महाजन, नरेश कड्डु जिल्हा अध्यक्ष प्रकाश पुजारी, प्रल्हाद सावंत, प्रविण ठाकरे, सुभाष खोबे, सुदाम टाकरस, आबासाहेब पाटील, बाबासाहेब गायकवाड, विभीषण सरपडे, सहजराव, श्रीधर कदम, महिला आघाडी प्रमुख वर्षाताई ठाकरे, सुनिता पाचलेगावकर, सल्लागार प्रमुख उल्लास मेडे. अमृत गोळे, बापू नरहरी, जिल्हास्तरीय प्रमुख सुनिल रणसिंग, समीर डाखोळे. अदित्य मानकर, नितीश पडोळे या सर्व पदाधिकाऱ्यांचा शाल पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. सभेचे राष्ट्रगीताने सांगता झाली. सभेची प्रस्तावना प्रल्हाद सावंत तर  सुत्रसंचालन सुनिल रणसिंग यांनी केले . आभार प्रविण ठाकरे यांनी मानले .