ग्रामिन प्रतिनिधी:-राजेश दामोदर
अंजनगांव सुर्जी तालुक्यातील भंडारज येथील निर्मला किशोर ढोरे यांनी प्रधानमंत्री जिवनज्योती विमा सेंट्रल बॅंक.ऑफ इंडिया शाखा भंडारज येथे ४३६ रुपयामध्ये विमा काढला होता . त्यांनतर त्यांचे आकसमित निधन झाले.त्यांच्या निधनानंतर काढलेल्या विम्याचा मोबदल म्हणूनतब्बल दोन लाख रुपये एवढी रक्कम ढोरे यांच्या परीवाराला सेन्ट्रल बँकऑफ इंडिया भंडारज शाखे कडून देण्यात आली.
निर्मला ढोरे यांचा मुलगा अजय किशोर ढोरे यांच्या शिक्षणासाठी मदत मिळाली असुन ,शाखा प्रबंधक स्वप्नील इंगळे तसेच सहाय्यक प्रबंधक टून्नु कुमार, बँक कृषि अधिकारी प्रतिक्षा बिसेन रोखपाल रोहीत खलोकर भंडारज येथिल डॉ. अरुणा दौड यांच्या हस्ते दोन लाख रुपयांचे चेक वितरण करण्यात आले,
सर्व योजनांची माहीती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य बँक मित्र म्हणून आशीष अवारे विक्की सुरळकर अक्षय दाळू हरिश ढोक रोशन खाडे तेजस निमकाळे विशाल आडे व बँक सखी म्हणून सुवर्णा कडू जया जवंजाळ रजनी दाळू पूजा नृपनारायन करीत आहे.





Social Plugin