प्रतिनिधी
" जगाच्या लोकसंख्येच्या जवळजवळ अर्ध्या भागात महिला आहेत, तरीही त्यांना जीवनाच्या अनेक पैलूंमध्ये असमान संधींचा सामना करावा लागतो. खऱ्या समानतेसाठी आणि जगाच्या अर्ध्या लोकसंख्येच्या क्षमतांना उलगडण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक आहे. शिक्षण हे महिला सक्षमीकरणाचे सर्वात शक्तिशाली साधन आहे." असल्याचे मत ग्राहक संरक्षण परिषदेचे शासननियुक्त अशासकीय सदस्य तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी केले.
जळकोट तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय चिंचोली येथे ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवार रोजी महिला सक्षमीकरण कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शासन नियुक्त ग्राहक संरक्षण परिषदेचे शासननियुक्त अशासकीय सदस्य तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून चिंचोलीच्या सरपंच सौ.बिरादार, माजी सरपंच संतोष बट्टेवाड, उपसरपंच राजेंद्र बंडारे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत सदस्या, ग्रामसेवक फिरोज शेख उपस्थित होते.
या कार्यक्रमाला गावातली सर्व महिला मंडळ, सेवाभावी संस्था, भजनी मंडळ, महिला बचत गटाच्या अध्यक्षा, सर्व महिला मंडळीसह धोंडूबाई घोडके, सुनीता डावळे, स्नेहा गायकवाड, चौत्राबाई गव्हाणे, सुनीता गव्हाणे, सुकवताबाई गिरी, विमल बोईनवाड, सविता पांगरे, विजयमाला गायकवाड, वैजयंता बट्टेवाड, रमाबाई गायकवाड, भीमाबाई गव्हाणे, भारतबाई गव्हाणे, जानकाबाई बिरादार, उषाबाई होनुळवाड, गौरी यादव, श्रीदेवी बेळकुंदे, चंद्रकला बेळकुंदे, सुनीता बिरादार, पुष्पा गायकवाड, अनिता गव्हाणे, पिंकाताई गव्हाणे, मंगलबाई गव्हाणे, सरुबाई बोईनवाड, राधाबाई पांगरे, राधाबाई बिरादार, सुशिलाबाई बिरादार, जनाबाई पांगरे, शोभाबाई पांगरे, सूर्यकला बिरादार, गंधारबाई घोडके, रुकमिनबाई बिरादार, शकुंतलाबाई गिरी, चंद्रकला हुंजे, सविताबाई हूंजे, सुलोचना बिरादार, रुक्मीनबाई यादव, सजाबाई गायकवाड, मिनाबाई गायकवाड यांच्या सह अनेक महिला उपस्थित होत्या.





Social Plugin