मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मेडशी : मेडशी ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयांचा निधी जमा असून पण विकास कामे रखडलेली. पाणीपुरवठा योजनेचे बट्याबोळ गावामध्ये भले मोठे उर्ध्व मोर्णा प्रकल्प असून पण नळ योजनेचे पाणी पुरवठा हा आठवडाभर, किंवा कधी कधी पंधरा-पंधरा दिवस होत नाही दर महिण्याची ही समस्या झाली आहे.
ग्रामपंचायत कर्मचारी यांना विचारपूस केल्यास ते नियमित लाईनचे प्रॉब्लेम आहे.मीटर खराब झाले.मोटर जळाली, पाईपलाईन फुटली आहे.नळ दुरुस्तीकामासाठी मजूर मिळत नाही कारण कामावर मजुर लावेल तर ग्रामपंचायत प्रशासनातील वरिष्ठाकडून मजुरांना टाईमावर पेमेंट दिले जात नसल्यामुळे नळदुरुस्तीच्या कुठल्याही कामाला गती मिळत नाही अशी अनेक कारणे सांगून स्वतःच्या अंगावरील घोंगडी बाजूला सारून उडवा उडवीची उत्तरे दिली जातात.
कसेबसे टोले घेऊन नळ योजना दुरुस्ती केली तर राजकीय पुढारी व वार्ड मेंबर यांचे मैत्री पूर्ण संबंध असलेल्या लोकांकडून अवैध्य पणे मोटार पंप लावून नाळ योजनेतील संपूर्ण पाण्याचा उपसा केल्यामुळे गोरगरीब नागरिकांना अपुरे व अर्धवटच पाणीपुरवठा मिळतो. मोटारी लावून नळ योजनेच्या पाण्याचा उपसा करणाऱ्या लोकांना मेडशी येथील राजकीय पुढारी व वार्ड मेंबर यांचे सहकार्य लाभल्यामुळे की? ग्रामपंचायत सचिव किंवा कार्यालयतिला कुठल्याही तरी टेबलाखालून हात घालणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अवेद्यरित्या मोटार पंप लावून पाण्याचा उपसा करण्याचा परमिशन दिल्यामुळे अवैद्यप्रकारे मोटारीद्वारा पाण्याचा उपसा केला जात आहे.कुणाश टाऊक...
मेडशी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधल्यास अशा समस्येसाठी कुठलेही नियोजन नसल्यामुळे व ग्रामपंचायत कर्मचारी व पाणीपुरवठा समिती मधील लोकांचे समन्वय नसल्यामुळे कामात टाळाटाळ होत असल्याचे सांगण्यात आले.
मेडशी ग्रामपंचायत मध्ये पाणीपुरवठा करण्याचा ठराविक वेळ पत्रक नाही.कुठलेही मोमेंट रजिस्टर व बायोमेट्रिक प्रणाली नसल्याचेही पहायास मिळते.ग्रामपंचायतीला कामानिमित्त फेरफटका मारल्यास सचिव साहेबांची खुर्ची नेहमी रिकामी दिसते तर कधी ग्रामपंचायत कर्मचारी त्या खुर्ची चा मन वेशीवर टांगून त्यात बसून समोरील टेबलावर लुडो खेळताना आढळतात असे नागरिकांकडून सांगण्यात येते आहे. असे असताना नागरिकांच्या समस्येचे निवारण कोण करणार. नागरिकांनी आपल्या समस्या कोणापुढे मांडाव्यात व वॉलच्या पाण्याचा आधार किती दिवस घ्यावा.धन्नू भवानीवाले,सुमित तायडे,जावेद भवानीवाले, व इतर नागरिकांकडून अशी चिंता व्यक्त होत आहे
अशा महत्त्वाच्या समस्या व दुर्लक्षित बाबीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले लक्ष केंद्र करणे गरजेचे होत आहे.





Social Plugin