Ticker

6/recent/ticker-posts

मलकापूर मुक्ताईनगर बसने प्रवास करणाऱ्या महिलेची गळ्यातील सोन्याची पोथ तोडली



पुन्हा एकदा महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर  महिलांनो सावधान तुम्ही जर प्रवासादरम्यान गळ्यामध्ये सोन परिधान करत असाल त्यावर कोणाची तिरकी नजर असू शकते.


प्रतिनिधी रविंद्र गव्हाणे मलकापूर

मलकापूर :- महाराष्ट्र सरकारने  महिलांना बस मध्ये पन्नास टक्के आरक्षण जाहीर केली तेव्हापासून महिलांची प्रवास करण्याची पसंती हे महाराष्ट्र परिवहन मंडळाला दिली आणि महिला  आवडीने एसटीने प्रवास करण्यास अधिक सुरुवात केली परंतु जसे इतर राज्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी बस मध्ये अनेक उपाययोजना असतात तशा मात्र या ठिकाणी दिसल्या नाही आणि त्यामुळेच या गोष्टीचा फायदा घेत चोरटे बदमाश आपल्या कामाला  लागले गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या महागड्या पोथा तोडून गर्दीतून पळ काढून घेतात असतात  अशा घटना रोज घडतात आणि मंगळवारी सुद्धा घडली

 मलकापूर वरून सुमारे २:३०ते ३ वाजे सुमारास मुक्ताईनगरला जाण्यासाठी बस निघाली महिलांची संत मुक्ताबाईंचे दर्शनासाठी जुडुंब गर्दी आणि याच गरजेचा फायदा घेत त्या बस मध्ये चोरीस अंजाम देणारे चोर पण प्रवास करण्यासाठी आत मध्ये आले बस मलकापूरच्या बाहेर आली बस आपल्या मार्गाने मार्गस्थ झाली तांदूलवाडी  दरम्यान महिलेच्या गळ्यातील पोत चोरून चोरीची घटना घडवून संशयित महिला दसरखेळ या ठिकाणी गाडीमधून उतरून गेली समोर गेल्यानंतर गेल्यानंतर संबंधित महिलेच्या लक्षात येतात सर्व गाडीमध्ये चर्चा झाली एसटी ड्रायव्हरने घटनेची गांभीर्र  लक्षात घेता बस थेट मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आली त्या ठिकाणी सर्वांची चेकिंग केली असता काहीच सापडून न आल्याने चोरीला वारदात  केलेली महिला मध्येच  कुठेतरी उतरून गेली असे सर्वांचे निदर्शनात आले  म्हणून पुन्हा एकदा महिलेच्या सुरक्षेत सुरक्षेतेचा प्रश्न अरणीवर आला आहे अशा रोजच्या घटना ध्यानात धरता सरकार यावरती काही कठोर पाऊल उचलेल का अशीच सर्वीकडून मागणी होत आहे .