मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
दि: 25/02/2025 रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सहा महिने कालावधी सेवाकाल पूर्ण करणाऱ्या युवा प्रशिक्षणार्थी कु.वैशाली रमेश तामस्कर(एकघरे)यांचा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा भौरद येथे निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रशिक्षणार्थी असलेल्या कुमारी वैशाली रमेश तामस्कर यांचा प्रशिक्षण कार्यकाळ 180 दिवस म्हणजे 6 महिने इतका कालावधी होता त्यांची नियुक्ती 26/08/2024 ते 22/02/2025 पर्यंत होती त्यांनी आपल्या या सेवाकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार व चांगले शैक्षणिक गुण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या या कार्याची पावती म्हणून
त्यांना जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतर्फे शाल श्रीफळ व भेटवस्तु देऊन सर्व मान्यवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.आणि मालेगावचे गुणवत्ता निरिक्षक श्री ए व्हि सोनोने सर, मुख्याध्यापक श्री नरवाडे सर, श्री तेलगोटे सर श्री आगर्ते सर तसेच विद्यार्थी, पालक व मान्यवारांनी आप आपले मनोगत व्यक्त केले. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले .
निरोप समारंभला उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संदीप हांडे, सरपंच सौ. बेबीताई गाढे व सर्व सदस्य सौ.मंगला सुभाष नपते,सौ. ज्योती जटाळे सौ. मीरा डाखोरे.सौ. सविता गौढळकर गावातील प्रतिष्टीत सचितानंदन एकघरे, कैलाशराव ढोके, भगवान ताजने तसेच गावातील महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.





Social Plugin