Ticker

6/recent/ticker-posts

दुधगांव मध्ये महाशिवरात्री पासून श्री दुधेश्वर यात्रा सुरु



 निखिल नलवडे-ग्रामीण प्रतिनिधी-

दुधगांव ता.मिरज येथील ग्रामदैवत श्री दुधेश्वर यात्रा व पीर ख्वाजा हैदारसो यांचा उरूस बुधवार महाशिवरात्री पासून सुरु होत आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दुधेश्वर यात्रेचा मुख्य दिवस बुधवार दि.२६/२/२५ रोजी आहे यादिवशी महाशिवरात्रीनिमित्त अभिषेक व भिजाणे होणार आहे. गुरुवार दि. २७ रोजी पीर ख्वाजा हैदारसो संदल व गलेफ तसेच सायं ६ वाजता श्री दुधेश्वर महाराज यांची पालखी निघणार आहे. 

यावेळी पालखीचे आकर्षण म्हणून गावातील ढोल-ताश्या, बैलगाडी, डॉल्बी, तसेच विश्वशांती असोसिएशन आयोजित भव्य आकर्षक आतिषबाजी आहे. यावेळी पालखी सोहळ्यासाठी हजारो भाविक उपस्थित असतात. महाशिवरात्री निमित्त मंदिरास खास विद्युत रोषणाई देखील करण्यात येते. शुक्रवार दि.२८ रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. तसेच दि.१ मार्च रोजी आर्केस्ट्रा सारेगमप कोल्हापूर यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. ग्रामपंचायत, यात्रा कमिटी व सर्व ग्रामस्थ दुधगांव यांचेकडून यात्रेची जोरदार तयारी सुरु आहे.