तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई
गेवराई (बीड): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सलग्नित एकता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना सात दिवसीय निवासी श्रमदान शिबिर ' निलजगाव' येथे सुरू आहे. आज शिबिराच्या पाचव्या दिवसाचे चौथे बौद्धिक सत्र संपन्न झाले. बौद्धिक क्षेत्राच्या बालविवाह प्रतिबंध कायद्याचे समावेश प्रबोधन या विषयावर युवा विचारवंत प्रा. अनिल गवळे यांनी निलजगाव ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. शासनाने केलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे .
यासाठी समाजातील जागृत नागरिकांनी पुढाकार घेणे काळाची गरज आहे. बालविवाह रोखण्यास संवेदनशीलतेची गरज आहे असे प्रा. गवळे म्हणाले. याप्रसंगी मंचावर उपस्थित चौथ्या बौद्धिक क्षेत्राचे अध्यक्ष परमेश्वर मोगल, सत्र समन्वयक डॉ. मुखत्यार शेख होते. या सत्राचे प्रास्ताविक प्रा. सय्यद मुजीब यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी अरुण मुगदल, कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अर्चना काटकर उपस्थित होते. या सत्राचे सूत्रसंचालन बी.ए. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी सादिया शेख तर आभार प्रदर्शन बी.ए. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी कल्याण खळदकर यांनी केले
.jpg)




Social Plugin