Ticker

6/recent/ticker-posts

सिंदखेडराजा तालुक्यात तहसीलदारांच्या आशिर्वादाने मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन व वाहतूक जोमात!



*अवैध रेती उत्खननाला उपविभागीय अधिकारी आळा घालतील का ?*

*सिंदखेडराजा(ज्ञानेश्वर तिकटे)*

सिंदखेडराजा  :- तालुक्यात तहसीलदार अजित दिवटे यांनी आर्थिक देवाणघेवाण करून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खननाला व वाहतूकीला खुलेआम परवानगी दिली असल्याचे चित्र दिसत आहे असून या अवैध रेती उत्खननाला उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे आळा घालतील का असा प्रश्न तालुक्यातील जनता करीत आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे की सिंदखेडराजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीपात्राजवळील गावे निमगाव वायाळ हिवरखेड पूर्णा, तढेगाव,राहेरी बु राहेरी खु ,दुसबिड, पिंपळगाव कुडा,लिंगा देवखेड,ताडशिवणी या गावातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन व वाहतूक सुरू आहे सदर अवैध रेती वाहतूक ही खाजगी रस्त्यावरून होत आहे सदर उत्खननाला मोठ्या प्रमाणात तहसीलदार अजित दिवटे कारणीभूत असून हे प्रति ट्रॅक्टर तिस हजार रुपये टिप्पर पंचेचाळीस हजार रुपये किन्ही पन्नास हजार रुपये जेसीबी एक लाख रुपये घेऊन सदर वाहतूक सुरू असल्याची चर्चा सिंदखेडराजा तालुक्यात जोर धरत आहे या वर कमाईतून तहसीलदार दरमहा कोट्यवधी रुपयांची कमाई करीत आहे  सदर तालुक्यात हीअवैध रेती तस्करी सुरू असल्याची  माहिती अनेक वृत्तपत्रांनी प्रकाशीत केली आहे तरी या अवैध रेती उत्खननाला उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे आळा घालतील का असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे 

या अवैध रेती उत्खनन व वाहतूक संदर्भात अनेक नागरिकानी फोन द्वारे व तक्रार दाखल करूनही  अद्याप कोणावरही कारवाई केली नसल्याने आता उपविभागीय अधिकारी प्रकरणात लक्ष केंद्रित करून कारवाई करतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे या अवैध रेती उत्खनन  प्रकरणी एका सामाजिक कार्यकर्ते यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे याबाबत आयुक्त काय कारवाई करणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे


उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे यांच्याकडे तालुक्यातील अवैध रेती उत्खनन करणाऱ्या खाजगी रस्त्यावर बोजा टाकण्याची तक्रार १२ जानेवारी रोजी दाखल करूनही अद्याप या तक्रारीवर कोणतीही कारवाई उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी केली नसल्याचे दिसते


[सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक गावातील रेती तस्कर किन्ही व फायबर द्वारे तसेच जेसीबी द्वारे रेती चे उत्खनन सुरू असल्याने भरधाव वाहणाऱ्या टिप्पर एखादा अपघात होऊन जिवित हाणी होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने उपविभागीय अधिकारी काय कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.